तीन तरुणी, दोन तरुण अन् लहानशी खोली; स्पा सेंटरच्या नावाखाली S*x रॅकेटचा पर्दाफाश

‘स्पा सेंटर’च्या नावाखाली सुरु असणारी चुकीची कामं आजवर पोलिसांच्या अनेक कारवाईंमधून समोर आली आहेत. अशीच एक धडक कारवाई करत पोलिसांनी पुन्हा एकदा एका सेक्स रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. उत्तर प्रदेशातील वाराणासी इथं या मोठ्या सेक्स रॅकेटचा पर्दाफाश करण्यात आला असून, इथं स्पा सेंटरच्या नावाखाली सेक्स रॅकेट सुरू असल्याची बाब कारवाईअंतर्गत उघडकीस आली.

घटनास्थळी पोलिसांनी जेव्हा धाड टाकली, तेव्हा तिथं अनेक झगमगणाऱ्या लाईट आणि काही लहान खोल्या आढळल्या. घटनास्थळावरून कंडोम आणि तत्सम आक्षेपार्ह सामानही पोलिसांनी जप्त केलं. वाराणासीच्या राजातालाब परिसरातील कचनार भागात पशुचिकित्सालयाच्याच नजीक असणाऱ्या Aura Heaven नावानं सुरू असणाऱ्या स्पा सेंटरमध्ये सुरू असणाऱ्या देहव्यापाराचा प्रकार खळबळजनकरित्या उघडकीस आला.

 

कशी केली कारवाई? 

राजातालाब पोलीस आणि SOG 2 या संयुक्त टीमनं कथित ‘स्वर्ग’ नावाच्या या ठिकाणी धाड टाकली असता तिथं दिसलेलं दृश्य पाहून त्यांच्याही पायाखालची जमीन सरकली. स्पा सेंटरमध्ये रंगीत रोषणाई असणाऱ्या अनेक लहान खोल्या होत्या. तिथं इत्रतत्र आक्षेपार्ह गोष्टी विखुरल्या होत्या, ज्यातून नेमकं काय सुरूय याची लगेचच कल्पना आली.

पोलिसांच्या या धाडसत्रानंतर घटनास्थळी एकच गोंधळ माजला, तितक्यातच या गोंधळाचा फायदा घेत स्पा मालकानं पळ काढला. मात्र पोलिसांनी तिथं असणाऱ्या तीन तरुणींसह दोन तरुणांना अटक करत पुढील चौकशी केली.

चौकशीतून समोर आलेल्या माहितीनुसार मनोज गुप्ता नावाच्या इसमाची ही इमारत असून, दोन महिन्यांपूर्वी इथं जौनपूरचा रहिवासी असणाऱ्या अनिल कुमारनं ती भाडेतत्त्वावर घेतली. दरम्यान पोलिसांच्या ताब्यात असणारे दोन्ही तरुण मिर्झामुराद भागातील राहणारे असून, घटनास्थळी कंडोमसह सापडलेली इतर सामग्री पोलिसांनी फॉरेन्सिक विभागाला तपासणीसाठी सोपवली आहे. दरम्यान, वाराणासी आणि या परिसरामध्ये अशा सर्व चुकीच्या प्रकारांविरोधातील ही कारवाई येत्या काळात आणखी तीव्र होणार असून, दोषींविरोधात कठोरातील कठोर कारवाई होणार असंच राजातालाबचे सहायक पोलीस आयुक्त अजय श्रीवास्तव यांनी स्पष्ट केलं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *