येथील जुना देवपूर रस्त्याजवळील एका विहिरीमध्ये गेल्या २४ दिवसांपासून बेपत्ता असलेल्या परिचारिकेची बॉडी आढळून आली. त्या नाशिक जिल्ह्यातील निफाड येथील एका खासगी रुग्णालयात कार्यरत होत्या. रंभाबाई आनंदा काळे (वय ६०) असे मृत परिचारिकेचे नाव आहे.
काय आहे प्रकरण?
रंभाबाई काळे (रा. मामलेदार चौक, निफाड) या बेपत्ता असल्याची तक्रार त्यांचा भाचा प्रवीण घायाळ यांनी निफाड पोलिस ठाण्यात २४ फेब्रुवारी रोजी दाखल केली होती. निफाड पोलिसांनी घटनेचा तपास करताना तांत्रिक विश्लेषणाच्या साहायाने मोबाइलमधील सीडीआर तपासला. त्यात संशयित क्रमांक आणि मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे निफाड येथील अरुण बाजीराव ढेपले (वय ४०) याला चौकशीसाठी ताब्यात घेतले होते.

विष पिऊन जीव देण्याचा प्रयत्न
त्यावेळी त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. चौकशीअंती त्याला सोडून देण्यात आले. मात्र, प्रकरणाची व्याप्ती वाढल्याचे कानावर आल्यानंतर संशयित अरुण ढेपले याने विष प्राशन करून जीव देण्याचा प्रयत्न केला. त्याच्यावर निफाड येथील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. उपाचारादरम्यान त्याने पोलिसांजवळ खुनाची कबुली दिली.
संबंधित महिलेला जीवे मारून निफाड जवळ जुना देवपूर रस्त्यालगत असलेल्या विहिरीत तिचं शव टाकल्याचं त्याने सांगितल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी तपास सुरू केला, तेव्हा विहिरीत तिची बॉडी आढळून आली.