चालकाला झोपेची डुलकी लागली अन् घात झाला; उज्जैन दर्शनावरुन परतताना नागपूरच्या मामा-भाच्याचा दुर्दैवी अंत, दोघे गंभीर

उज्जैन येथे देवदर्शनासाठी गेलेल्या भाविकांच्या कारचा मध्यप्रदेशातील ढाकना गावाजवळ भीषण अपघात होऊन कामठी आणि नागपूरातील मामा-भाच्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी सकाळी घडली. या अपघातात अन्य दोघेजण गंभीर जखमी असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या घटनेमुळे कामठी आणि नागपूर परिसरात शोककळा पसरली आहे. मृतांमध्ये शुभम जयस्वाल (२८, रा. रनाळा, कामठी) याचा घटनास्थळीच मृत्यू झाला, तर त्याचा मामा पारस कनोजिया (३५, रा. मानकापूर, नागपूर) यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. अपघातात अमन जयस्वाल (२६) आणि जतिन कनोजिया (३४) हे दोघेजण गंभीर जखमी झाले असून त्यांना पुढील उपचारासाठी भोपाळ येथे हलविण्यात आले आहे.

कार पालटली

मिळालेल्या माहितीनुसार, अमन, जतिन, पारस आणि शुभम हे चौघेजण उज्जैनजवळील नलखेडा परिसरातील बगलामुखी मंदिराचे दर्शन घेऊन नागपूरकडे परतत होते. गुरुवारी सकाळी बैतूल आणि हरदा जिल्ह्यांच्या सीमेवरील ढाकना गावाजवळील हरई परिसरात त्यांच्या कारवरील चालकाचे नियंत्रण सुटले आणि वाहन रस्त्यावर पलटी झाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *