मुंबई-पुणे एक्सप्रेस वे वर पाच गाड्या आदळल्या; भीषण अपघातात तिघांचा जागीच मृत्यू

बुधवार, 18 मार्च 2026 रोजी मुंबई पुणे एक्सप्रेस वे वर भीषण अपघात झाला. खोपोली नजिकच्या नवीन बोगद्यात झालेल्या या भीषण अपघातात एकूण तीन जणांचा मृत्यू ओढावला. प्रथमदर्शनींच्या माहितीनुसार कारनं प्रवास करणाऱ्या तिघांवर घटनास्थळीच काळानं घाला घातला.

पूण्याहुन मुंबईकडे जाणाऱ्या मार्गांवर खोपोली एक्सिटच्या शेजारी झालेल्या नवीन मार्गांवरील बोगद्यात अपघात झाला. इथं एकूण पाच गाड्या एकमेकांवर आदळून हा अपघात झाला, ज्यामध्ये तीन ते चार जण किरकोळ जखमी असल्याचंही सांगण्यात आलं.

या अपघाताची माहिती मिळताच आय आर बी पेट्रोलिंग, देवदूत यंत्रणा, बोरघाट महामार्ग वाहतूक पोलीस यंत्रणा, खोपोली पोलीस स्टेशनची यंत्रणा, डेल्टा फोर्स, महाराष्ट्र सुरक्षा बल, मृत्युंजय देवदूत आणि हेल्प फाउंडेशनची टीम घटनास्थळावर पोहोचून त्यांनी बचावकार्य सुरू केलं. लोकमान्य हॉस्पिटलची रुग्णवाहिकासुद्धा इथं दाखल झाली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *