धर्मस्वातंत्र्य कायद्याअंतर्गत महाराष्ट्रात पहिला गुन्हा! धर्म लपवला, घरात घुसून दोनदा बलात्कार केला अन्…

ज्यात मागील अनेक दिवसांपासून चर्चेत असलेलं धर्मांतरासंदर्भातील नियम आणि निर्बंध घालण्यासाठी ‘महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य अधिनियम 2026’ हे विधेयक सोमवारी विधानसभेमध्ये बहुमताने संमत करण्यात आलं. राज्यमंत्री पंकज भोयर यांनी हे विधेयक शुक्रवारी विधानसभेत मांडलं होतं. यावर चर्चा करून हे विधेयक मंजूर करण्यात आलं आहे. हे विधेयक संयुक्त समितीकडे पाठवण्याचा प्रस्तावही विधानसभेत मंजूर झाला आहे. या मंजुरीच्या माध्यमातून सदर कायद्याला तत्वत: मान्यता मिळालेली असतानाच या कायद्याअंतर्गत राज्यात पहिला गुन्हा दाखल झाला आहे. हा गुन्हा नाशिकमधील इगतपुरीमध्ये दाखल झाला आहे.

खाटेवर सर्वत्र रक्ताचे लोट

भाईंदर पश्चिमेच्या जोशी रुग्णालयात 12 मार्च रोजी श्वसनाचा अधिक त्रास जाणवू लागल्याने इतर आजारांनीही ग्रस्त असलेल्या भाईंदर पूर्वेच्या रहिवासी असलेल्या 89 वर्षीय सुहासिनी माठेकर यांना त्यांच्या कुटुंबीयांनी दाखल केले होते. तेव्हापासून शुद्धीवर नसल्याने त्यांच्यावर रुग्णालयातील अतिदक्षता विभागात व्हेंटिलेटर वर उपचार सुरू होते. काल सोमवारी पहाटे त्यांना पाहण्यासाठी त्यांचे कुटुंबीय आले असता, खाटेवर सर्वत्र रक्ताचे लोट पसरल्याचे पाहायला मिळाले. त्यामुळे कुटुंबीयांनी कुठे इजा झाली आहे का ? हे पाहिले असता उंदराने त्यांचा उजव्या हाताचा कोपरा कुरतडला असल्याचे दिसून आले. सुरुवातीला रुग्णाला झोपून इजा झाल्याचा दावा उपस्थित रुग्णालय कर्मचार्‍यांकडून केला जात होता. मात्र, नंतर कुटुंबीयांनी उंदराचे पुरावे दिल्यानंतर त्यांनी ही बाब मान्य करून कुरतडलेल्या जखमेवर उपचार सुरू करण्यात आले होते. त्यानंतर सायंकाळी पाच वाजताच्या सुमारास रुग्ण महिलेचा अचानक मृत्यू झाला.

‘आईच्या मृत्यूला रुग्णालय प्रशासनच जबाबदार’

या प्रकरणी शिवसेना उबाठासह मनसेकडून ठिय्या आंदोलन करण्यात आल्यानंतर अतिदक्षता विभागातील डॉक्टर व परिचारीका अश्या दोघांना तात्काळ कार्यमुक्त करण्यात आले आहे. यासह संबंधित प्रकरणाच्या चौकशीसाठी समिती नेमण्यात आली आहे. उंदराच्या वावराबाबतची पूर्वसूचना देण्यात आली होती. मात्र, त्यावर कोणतीच कारवाई करण्यात न आल्याने ही घटना घडली असल्याचा दावा रुग्ण महिलेची मुलगी मीनल माठेकर देसाई यांनी केला आहे. ‘आईच्या मृत्यूला रुग्णालय प्रशासनच जबाबदार असल्याचे सांगत’, त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी आता त्यांनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *