शब्ब्या हाक का मारली? चेष्टा-मस्करी जिवावर, साथीदारांना बोलावून पुण्यात भररस्त्यात तरुणाला संपवलं

चेष्टा-मस्करीत “शब्ब्या” अशी हाक मारली आणि ती जीवावर बेतली. “अशी हा का मारली?” म्हणत तरुणाने मित्रांना बोलावून तरुणाचा जीव घेतला. ही धक्कादायक घटना पुण्यातील कॅम्प परिसरामध्ये घडली आहे. या घटनेत फैसल फारुख खान (वय ३०, रा. कौसरबाग, कोंढवा) याचा मृत्यू झाला असून तिघांना अटक करण्यात आली आहे.

नेमकं काय घडलं?

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी (१० मार्च) रात्री सव्वा दहाच्या सुमारास फैसल हा न्यू मोदीखाना मस्जिदजवळ मित्रांसोबत उभा राहून गप्पा मारत होता. त्यावेळी दुचाकीवरून काही तरुण तेथून जात होते. फैसलने त्यातील एकाला चेष्टा-मस्करीत “शब्ब्या” अशी हाक मारली. ही हाक आरोपींच्या जिव्हारी लागली. काही वेळातच ते परत आले आणि “अशी हाक का मारली?” अशी विचारणा करत वाद घालू लागले.

साथीदारांना बोलावून घेतलं

वाद वाढत गेल्यानंतर आरोपींनी मोबाईलवरून आणखी एका साथीदाराला बोलावून घेतले. त्यानंतर त्यांनी फैसलला लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. मारहाणीच्या दरम्यान एका आरोपीने चाकू काढून त्याच्यावर वार केले. गंभीर जखमी झालेल्या फैसलला तातडीने रुग्णालयात नेण्यात आले. मात्र चाकूच्या वारामुळे झालेल्या अंतर्गत रक्तस्त्रावामुळे उपचार सुरू असतानाच त्याचा मृत्यू झाला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *