पत्नीशी अनैतिक संबंध असल्याचा संशय, पतीने वेटरचा जीव घेतला, ठाण्यात भातशेतामध्ये बॉडी टाकली, चार तासात उलगडा

पत्नीशी अनैतिक संबंध असल्याच्या संशयातून एका वेटरची डोक्यात लोखंडी हातोडा मारून हत्या करण्यात आली. या प्रकरणातील आरोपी पतीला शिळ-डायघर पोलिसांनी अटक केली आहे. विशेष म्हणजे अवघ्या चार तासांत पोलिसांनी या गुन्ह्याचा छडा लावला. सीसीटीव्ही कॅमेऱ्यातील चित्रीकरण आणि तांत्रिक माहितीआधारे पोलिसांनी शिळ गावात राहणाऱ्या ३९ वर्षीय व्यक्तीला अटक केली.

काय आहे प्रकरण?

शिळ-डायघरमधील पिंपरी गावातील भातशेतात प्रकाश बिसा याची बॉडी आढळून आली होती. मूळचा उत्तर प्रदेशातील प्रकाश नवी मुंबईतील महापे येथील एका कॅन्टिनमध्ये काम करत होता. त्याच्या हत्येप्रकरणी मंगळवारी शिळ-डायघर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.

सीसीटीव्हीवरुन उलगडा

आरोपींच्या शोधासाठी वरिष्ठ पोलिस निरीक्षक श्रीराम पोळ यांनी दोन पथकांची स्थापना केली. सीसीटीव्ही कॅमेऱ्यातील चित्रीकरण आणि तांत्रिक माहितीआधारे पोलिसांनी शिळ गावात राहणाऱ्या एका ३९ वर्षांच्या व्यक्तीला अटक केली. त्याच्या चौकशीत या हत्येचा उलगडा झाला.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *