ठाणे जिल्ह्यात कल्याण-तळोजा मेट्रो 12 या प्रकल्पासाठी काम वेगाने सुरू आहे. यासाठी ठाणे पोलिसांनी वाहतुकीत मोठे बदल केले आहेत. कल्याण-शिळ मार्गावरील वाहतुकीवर परिणाम होणार असून, हे बदल 6 मार्चपासून लागू करण्यात आले आहेत. कल्याण-शिळ मार्गाऐवजी पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे निर्देश वाहतूक पोलिसांनी दिले आहेत.
कधी असणार बंदी?
कल्याण-शिळ मार्गावर सध्या कल्याण-तळोजा मेट्रोचं काम सुरू आहे. ही मार्गिका उन्नत असल्यामुळे ठीक-ठिकाणी खांब उभारणी सुरू आहे. या खांबांसाठी सीमेंटचे र्गडर बसवण्याचं काम सुरू आहे. या कामांसाठी ठाणे पोलिसांनी रात्री कल्याण-शिळ मार्गावरील काही भागांतील मार्ग बंद करण्यात येणार आहेत. हे निर्बंध 6 मार्च 2026 पासून सुरू झाले असून 31 मार्चपर्यंत कायम राहणार आहेत. रात्री 11.55 ते पहाटे 5 वाजेपर्यंत वाहनचालकांना पर्यायी मार्ग वापरण्याचे निर्देश दिले आहेत.
कल्याण-शिळ मार्गावरील मानपाडा सर्कल ते टाटा नाका दरम्यान गर्डर बसवण्याचं काम हाती घेतलं आहे. यावेळी सिमेंट गर्डर बसवताना जड गॅन्ट्री उपकरणांता वापर करेला जाणार आहे. यावेळी वाहनचालकांच्या सुरक्षेसाठी हा मार्ग तात्पुरता बंद करण्यात येणार आहे. त्यावेळी वाहतूक वळवली जाईल. या संपूर्ण महिन्यात टप्प्या-टप्प्याने वाहतूक बंद केली जाणार आहे. तरी वाहनचालकांनी बंद असलेल्या मार्गांची नोंद घेऊन प्रवास करणे टाळावे.
कोणत्या मार्गांवर वाहतूक बदल?
6 मार्च ते 10 मार्चदरम्यान,शिळफाटा येथून कल्याणच्या दिशेने जाणाऱ्या वाहतूक पिलर क्रमांक 180 जवळ सोनारपाडा येथे वाहतूक बंद करण्यात येणार आहे. यावेळी सर्व वाहने सर्विस रोडवर डावीकडे वळवली जाऊन डीएनएस चौकमार्गे पुढे जातील. 11 मार्च ते 18 मार्च दरम्यान विकोनकाजवळ पिलर क्रमांक 105 येथे प्रवेशबंदी असेल. यावेळी वाहने डावीकडे वळवून सर्व्हिस रोडवरून पुढे खांब क्रमांक 67 टाटा नाकावरून इच्छित स्थळी जातील.
19 मार्च ते 25 मार्च दरम्यान कल्याण पिलर क्रमांक 200 जवळ मानपाडा चौकातून डावीकडे वळवून सर्व्हिस रोडवरून पुढे जाऊन पिलर क्रमांक 180 सोनारपाडा येथून आपल्या मार्गी जातील. 26 मार्च ते 31 मार्च या कालावधीत सोनारपाडा येथील पिलर क्रमांक 164 जवळ वाहतूक बंद राहणार आहे. त्यावेळी सर्व्हिस रोडवरून वाहने वळवून डीएनएस चौकाकडे जातील.
