एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचा राज्यसभा उमेदवार ठरला, कोण आहे हा नेता?

राज्यसभा निवडणुकीसाठी भाजपाने 4 उमेदवार जाहीर केले असताना, आता एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचा उमेदवार ठरला असून अधिकृत शिक्कामोर्तब झालं आहे. या उमेदवारीसह शिवसेना दलित चेहरा असणाऱ्या नेत्याला संधी देत आहे. यासंदर्भातील अधिकृत घोषणा थोड्याच वेळात होणार आहे.

कोण आहे हा नेता?

शिवसेनेकडून दलित समाजातील आक्रमक चेहरा असणाऱ्या ज्योती वाघमारे यांना संधी देण्यात आली आहे. एकेकाळी बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वात शिवसेनेची महिला आघाडी आक्रमक असायची. एकनाथ शिंदे यांनी देखील शिवसेनेच्या महिला आघाडीला संधी देत सत्तेत वाटा दिला आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्यानंतर एकनाथ शिंदे यांनी ग्राऊंड झिरोवर काम करणाऱ्या महिलांना संधी दिल्याचा संदेश एकनाथ शिंदे यांनी दिल्याचं यानिमित्ताने दिसून येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *