मराठी तसेच हिंदी सिनेसृष्टीत लोकप्रियता मिळवलेल्या ज्येष्ठ अभिनेत्री वर्षा उसगांवकर यांची मोठ्या प्रमाणात फसवणूक झाली आहे. वर्षा उसगांवकर यांची तब्बल 47 लाखांना फसवलं आहे. वर्षा उसगांवकर आणि मृणालिनी जांभळे यांच्यासह अनेक अभिनेत्रींना दिग्दर्शक तसेच बांधकाम व्यावसायिक अविनाश जाधव यांच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला असूनन पोलिस या प्रकरणाचा तपास करत आहे. अभिनेत्री वर्षा उसगांवकर आणि मृणालिनी जांभळे यांची 47 लाखांची फसवणूक झाली आहे. मुंबईतील शिवाजी पार्क पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या तक्रारीनुसार,अभिनेत्री मृणालिनी सुभाष जांभळे यांच्यासह अनेक अभिनेत्रींचा समावेश आहे.
आरोपीने मृणालिनी जांभळे आणि वर्षा उसगांवकर यांना डोंबिवली येथील एका रिअल इस्टेट प्रकल्पात गुंतवणूक करण्यास प्रवृत्त केले. गुंतवणूक केल्यास मोठ्या प्रमाणात ‘रिटर्न्स’ (परतावा) देण्याचे आमिष दाखवण्यात आले.
एक वर्षाच्या आत मूळ रक्कम परत करण्याचे लेखी आश्वासनही देण्यात आले होते. एकूण 47 लाख रुपयांची गुंतवणूक केली होती. गुंतवणुकीची मुदत संपूनही पैसे परत न मिळाल्याने आणि आरोपीने टाळाटाळ केल्यामुळे अखेर पोलिसांत धाव घेण्यात आली. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अविनाश जाधव हे दिग्दर्शक असून व्यावसायिक आहेत. एका प्रोजेक्टमध्ये पैसे गुंतवले. अविनाश जाधव यांनी दिलेल्या एका वर्षात रिटर्न देण्याचा शब्द दिला होता. नोव्हेंबर 2019 आणि फेब्रुवारी 2020 मध्ये तक्रार दाखल करण्यात आलेली आहे. शयित आरोपी अविनाश जाधव याने विश्वास संपादन करण्यासाठी सुरुवातीला परतावा म्हणून सुमारे साडेचार लाख रुपये दिले होते. मात्र, त्यानंतर त्याने पैसे देणे पूर्णपणे बंद केले. जेव्हा मृणालिनी जांभळे, वर्षा उसगांवकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी पैशांसाठी तगादा लावला, तेव्हा जाधवने आपला मोबाइल क्रमांक आणि घराचा पत्ता वारंवार बदलून पोलिसांपासून आणि गुंतवणूकदारांपासून वाचण्याचा प्रयत्न केला. तक्रारदारांनी जेव्हा त्याचा शोध घेऊन डोंबिवलीत त्याला गाठले, तेव्हा त्याने पैसे देण्यास स्पष्ट नकार दिला. “मी पैसे देणार नाही, जे काय करायचं ते करा,” अशा शब्दांत त्याने उर्मटपणे उत्तर देत अभिनेत्रींना धमकी दिली. आपली फसवणूक झाल्याची खात्री पटल्यानंतर सर्व तक्रारदारांनी २६ फेब्रुवारी २०२६ रोजी दादर येथील शिवाजी पार्क पोलीस ठाण्यात धाव घेऊन फिर्याद नोंदवली. या गंभीर प्रकरणाचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक (API) शैलेश शेजुळ यांच्याकडे सोपवण्यात आला असून पोलीस सध्या या प्रकरणाची कसून चौकशी करत आहेत.
