मुंबई-पुणे एक्सप्रेवेवर मोठ्याप्रमाणावर वाहतूक कोंडी होते. यावर उपाय म्हणून प्रशासन आता ‘मिसिंग लिंक’ तयार केला जात आहे. या प्रकल्पाचा अंतिम टप्प्याचे काम पूर्ण झाले असून, लवकरच हलक्या वाहनांना या ब्रीजवरून जाण्याची परवानगी मिळणार आहे. मात्र, सुरक्षेचा विचार करता, अद्यापही ज्वलनशील पदार्थ वाहून नेणाऱ्या वाहनांना परवानगी मिळणार नसल्याची माहिती आहे.
मुंबई-पुणे महामार्गावरील वाहतूक कोंडीच्या समस्येवरील उपाय
दरम्यान, नागरिकांना मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवरील वाहतूक कोंडीचा सामना नेहमीच करावा लागतो. अशात काही अपघात झाल्यास तासन् तास वाहन चालकांना वाहतूक कोंडी सुटण्याची वाट पाहावी लागते. काही दिवसांपूर्वी या एक्सप्रेसवेवर प्रोपिलीनचा टँकर उलटला होता. ज्यामुळे झालेल्या वाहतूक कोंडीमुळे अनेक वाहन चालक 30 ते 32 तास तिथेच अडकून राहिले होते. यावेळी त्यांना खुपच हाल सोसावे लागले होते. या सगळ्या प्रकारामुळे महामंडळाच्या नियोजनाकडे प्रवाशांनी बोट दाखवून संताप व्यक्त केला होता. या समस्या लक्षात घेता महामंडळाने काही उपाययोजना करण्याचा निर्णय घेतला.
मिसिंग लिंक 1 मे पासून होणार सुरू
वाहतूक कोंडीच्या सर्व समस्यांवर उपाय म्हणून तयार करण्यात येणारा मिसिंग लिंक येत्या 1 मे पासून प्रवाशांसाठी खुला करण्यात येणार आहे. या एक्सप्रेसवेचे काम आता अंतिम टप्प्यावर आले आहे. हे लक्षात घेता मान्यवर आणि संस्थांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे या ब्रीजवर हलक्या वाहनांना प्रवास करण्याची परवानगी द्यावी अशी विनंती केली आहे. या पार्श्वभूमीवर हा रस्ता मे महिन्यात खुला झाल्यानंतर पहिल्या टप्प्यात पहिल्या सहा महिन्यात फक्त हलक्या वाहनांना प्रवास करण्याची परवानगी दिली जाईल. ज्वलनशील वाहनांचा प्रावस मात्र टाळला जाईल. यावेळी रस्त्याच्या गुणवत्तेचे आणि क्षमतेचे निरिक्षण केले जाणार आहे.
पुणे- बेंगलोर महामार्गावर कंटेनर पलटी झाल्याची घटना
तसेच या एक्सप्रेसवेवर काल कंटेनर उलटल्याची आणखी एक घटना घडली. पुणे- बेंगलोर महामार्गावर रस्त्यातच कंटेनर पलटी झाल्याने मध्यरात्री एक वाजेपर्यंत वाहन चालक आणि प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागला. पुणे-मुंबई-सातारा या शहरांकडे जाणाऱ्या मार्गावर रात्री नऊ वाजता पलटी झालेला कंटेनर एक वाजता बाजूला करण्यात आला तर त्यानंतर जवळपास दहा ते बारा किलोमीटर लागलेल्या वाहनांच्या रांगा रिकाम्या करण्यात आल्या. कराड जवळ खोडशी येथे हा अपघात झाल्याने पूर्ण रस्ता बंद झाला होता. कंटेनर मोठा असल्याने अनेक वाहन चालकांनी आणि प्रवासी ने रस्त्यातच जेवण उरकून घेतले. यावेळी ॲम्बुलन्स देखील या ट्रॅफिक मध्ये बराच काळ अडकली होती.
