नॅशनल हायवेवर सुरु करा स्वत:चा व्यवसाय; फूड कोर्ट ते पेट्रोल पंपपर्यंत सर्वकाही एका क्लिकवर, गडकरींची घोषणा!

राष्ट्रीय महामार्गावर तुम्हाला तुमचा व्यवसाय सुरु करायचाय? एखादा पेट्रोल पंप किंवा फूड कोर्ट सुरु करायचा विचार करताय? मग ही अपडेट तुमच्यासाठी अत्यंत महत्वाची आहे. कारण राजमार्ग प्रवेश याद्वारे तुम्हाला ते शक्य होणार आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी दिल्लीत ‘राजमार्ग प्रवेश’ (Rajmarg Pravesh) पोर्टलचे उद्घाटन केले. रस्ते मंत्रालय, NHAI आणि NHIDCL च्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत हे पोर्टल सुरू झाले आहे. हे पोर्टल राष्ट्रीय महामार्गांशी जोडलेल्या जमिनी, रस्ते आणि व्यवसायासाठी ना हरकत प्रमाणपत्र (NOC) आणि इतर परवानग्या मिळवण्यासाठी एकच ऑनलाइन ठिकाण आहे. सामान्य नागरिक, खासगी कंपन्या आणि सरकारी विभाग सर्वांसाठी हे सोपे केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *