संदीपान भुमरेंचा ड्रायव्हर 1150 कोटींचा मालक?; अंबादास दानवेंनी पुराव्यांसह उघड केला महाघोटाळा

एखाद्या गाडीवर चालक म्हणून काम करणाऱ्या माणसाकडे किती संपत्ती असू शकते? जेमतेम घर चालवण्याइतपत एखाद्या चालकाची कमाई असते. मात्र संभाजीनगरात असा एक गाडी चालक आहे त्याच्यावर तब्बल सोळाशे कोटी रुपयांच्या जमिनीचा मालक असल्याचा आरोप आहे. आणि हा चालक आहे संभाजीनगरचे खासदार संदीपान भुमरे यांचा, अंबादास दानवे यांनी भुमरेंच्या चालकावर आरोप करून पुन्हा एकदा खळबळ उडवून दिलीय. त्याला भुरेंनीही आता प्रत्यूत्तर दिलंय

हा आहे जावेद शेख… व्यवसायाने हा खासदार संदीपन भुमरे यांचा गाडी चालक आहे. गेल्या 15 ते 20 वर्षांपासून जावेद शेख हा भुमरे यांच्या गाडीवर चालक म्हणून काम करतोय. मात्र गेल्या वर्षभरात हा जावेद शेख चांगलच प्रकाशझोतात आलाय. तो ही तब्बल 1600 कोटीसाठी… ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते अंबादास दानवे यांनी या चालकाच्या नावावर भुमरे यांनी शासनाचे तब्बल 1150 कोटी गिळायचा डाव रचला असा आरोप केलाय. शहराजवळची एक जमीन जी समृद्धी महामार्गात गेलाय. त्यापोटी 1150 कोटी चा मोबदला मिळणार आहे. तिथं एका महिलेने भुमरेंचा चालक जावेद शेख याला ही जमीन हीबानामा म्हणजे समजणाऱ्या भाषेत बक्षीस पत्राद्वारे दिली असा दानवे यांचा आरोप आहे. यामागे खासदार आमदार भुमरे पितापुत्र असल्याचा दानवे यांनी गंभीर आरोप केलाय. आणि याची चौकशी करण्याची त्यांनी मागणी केली आहे.

अंबादास दानवेंनी केलेल्या आरोपांनतर खासदार संदीपान भुरेंनी संताप व्यक्त केलाय. भुमरे यांनी तातडीने पत्रकार परिषद घेत दानवेंचे सगळे आरोप फेटाळून लावलेत. माझ नाव जाणिवपूर्वक यांत गोवण्याचा प्रयत्न दानवेंकडून गोवण्याचा प्रयत्न केला जातोय. त्यामुळे दानवेंवर अब्रुनुकसानीचा दावा ठोकणार असल्याचं संदीपान भुमरेंनी म्हटलंय.

तर अंबादास दानवेंनी केलेले हे आरोप संदीपान भुमरेंचा चालक जावेद शेखने यांनीही फेटाळून लावलेत. माझ्यावर दानवेंनी केलेले आरोप बिनबुडाचे आहेत. त्यांच्यावर अब्रुनुकसानीचा दावा करणार असल्याचं जावेद शेख यांनी म्हटलंय.

अंबादान दानवे यांनी खासदार संदीपान भुमरेंचा चालक आणि भुमरे पितापुत्रावर पुन्हा एकदा आरोप करून खळबळ उडवून दिलीय. या प्रकरणांची चौकशी सुरू आहे.  या चौकशीतून काय समोर येणार हे पाहणं महत्वाचं ठरणाराय.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *