पवन हंस हेलिकॉप्टर समुद्रात कोसळले; अंदमान – निकोबार बेटांवर मोठी दुर्घटना

रांची येथे मोठी विमान दुर्घटना घडली असताना अंदमान – निकोबार बेटांवर मोठी दुर्घटना घडला आहे.  उड्डाणानंतर काही वेळातच पवन हंस हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड झाला. हे विमान सुमद्रात कोसळले आहे.

पवन हंस कंपनीचे हे हेलिकॉप्टर पोर्ट ब्लेअरहून मायाबंदरला जात होते. या हेलिकॉप्टरमध्ये सात जण होते. पवन हंसच्या प्रवक्त्याने दिलेल्या माहितीनुसार, ही घटना सकाळी 9.30 च्या सुमारास घडली. हेलिकॉप्टरने पोर्ट ब्लेअरहून दोन क्रू मेंबर्स आणि पाच प्रवाशांसह उड्डाण केले.

तांत्रिक बिघाडामुळे हेलिकॉप्टर समुद्रात कोसळले

उड्डाणादरम्यान हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड झाला. परिस्थिती लक्षात घेता, सर्वांच्या सुरक्षिततेचा विचार करून वैमानिकाने हेलिकॉप्टर समुद्रात उतरवण्याचा निर्णय घेतला. मायाबंदरमध्ये लँडिंग करताना हेलिकॉप्टर धावपट्टीपासून सुमारे 300 मीटर अंतरावर समुद्रात उतरल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. प्राथमिक माहितीच्या आधारे, तांत्रिक बिघाडाचे कारण शोधण्यासाठी चौकशी सुरू करण्यात आली आहे.

इंजिनमध्ये बिघाड झाल्याने लेहला जाणारे स्पाइसजेटचे विमान दिल्लीला परतले

मंगळवारी सकाळी लेहला जाणाऱ्या स्पाइसजेटच्या विमानाच्या इंजिनमध्ये बिघाड झाला यामुळे हे विमान दिल्लीला परतले. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार एसजी 121  क्रमांकाचे बोईंग 737 विमान सुमारे 150 प्रवाशांना घेऊन जात होते. स्पाइसजेटच्या प्रवक्त्याशी संपर्क साधला असता, मंगळवारी दिल्लीहून लेहला जाणारे विमान तांत्रिक समस्येमुळे राजधानीत परतले.
“विमान दिल्लीत सुरक्षितपणे उतरले आणि सर्व प्रवाशांना सामान्यपणे विमानातून उतरवण्यात आले,” असे प्रवक्त्याने एका निवेदनात म्हटले आहे. सूत्रांनी सांगितले की विमानाच्या इंजिनमध्ये बिघाड झाला होता. प्रवक्त्याच्या मते, कॉकपिटमध्ये आगीची कोणतीही सूचना देण्यात आली नव्हती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *