मालेगाव हादरले! 7 वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार….

मालेगाव शहर पुन्हा एकदा हादरले आहे.  नाशिक जिल्ह्यातील मालेगाव येथे एका तरुणाने 7 वर्षांच्या चिमुकलीवर लैंगिक अत्याचार केल्याची घटना घडली आहे. 20 वर्षीय अरीब अहमद अतिक अहमद राहणार अंजुमन चौक, मालेगाव या संशयित नराधम तरुणाला पोलिसांनी पकडलं आहे. एका 7 वर्षीय बालिकेवर छत्रपती शिवाजी महाराज टाऊन हॉल जुन्या महानगर पालिकेसमोर ती बालिका लहान मुल – मुलींसोबत खेळत असताना त्याने तिचे वर लैंगिक अत्याचार केले . या घटनेची माहिती समजताच तेथील स्थानिकांनी त्याला वेळीच पकडून किल्ला पोलिस ठाण्यात आणून पोलिसांच्या स्वाधीन केले.

त्याचेवर सि.सि.टी.एन.एस.गु.र.नं 28/2026 BNS कायदा कलम 74,75 सह बालकाचे लैंगिक सरंक्षण कायदा 2012 चे कलम ८ प्रमाणे गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे. दरम्यान  गेल्या दोन दिवसांपूर्वी देखील सदर या संशयित नराधम आरोपीने एका लहान बालकावर देखील असेच गैरकृत्य केल्याचे तेथील त्या बालकाच्या नातेवाईकांनी सांगितले. सदर घटनास्थळ टाऊन हॉल परिसर, तुडक्या भिंती इमारती, संरक्षक गेट नीट नसणे यामुळे हा परिसर नेहमीच नशा करणाऱ्यांचा अड्डा बनला असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे येथे वेळीच महानगर पालिका आणि पोलिस प्रशासनाने मिळून यावर अंकुश आणला पाहिजे अशी नागरिकांकडून मागणी केली जात आहे. या प्रकरणी आता संशयित आरोपीला उद्या न्यायालयात हजर करण्यात येईल आणि त्याला किती दिवसांची पोलिस कोठडी मिळेल तसेच त्या पोलिस कोठडीवर पोलिस आरोपी विरुद्ध कसे पुरावे गोळा करतील हे बघणे महत्वाचे ठरेल.

बुलढाण्यात गतिमंद मुलीवर अत्याचार 

बुलढाणा जिल्ह्यामध्ये एक खळबळजनक घटना समोर आली असून मोताळा तालुक्यातील बोराखेडी शिवारामध्ये एका 17 वर्षीय अल्पवयीन गतिमंद मुलीचा मृतदेह विवस्त्र अवस्थेत नदीच्या पाण्यावर तरंगताना आढळला .. यामुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून या मुलीवर लैंगिक अत्याचार करून तिची हत्या करण्यात आली असावी का ?, असा प्राथमिक संशय व्यक्त केला जात आहे. मोताळा येथील प्रशासकीय इमारतीच्या पाठीमागच्या गिट्टी खदान जवळ असलेल्या परिसरात घटना उघडकीस आलीय .. याप्रकरणी आता बोराखेडी पोलिसांनी तपास सुरू केलं असून शवविशेदन तसेच तांत्रिक बाबींच्या आधारे तपास केलाय जात आहे .. गतिमंद मुलगी दोन दिवसापासून घरातून बेपत्ता होती.. मात्र सर्वत्र शोध घेत असताना तिचा मृतदेही आढळून आल्याने खळबळ उडाली आहे ..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *