माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या संचालकपदी सुनेत्रा पवार यांची बिनविरोध निवड झालीय. अजितदादांच्या निधनानंतर संचालकपद रिक्त झालं होतं. या रिक्त पदावर सुनेत्रा पवार यांची बिनविरोध वर्णी लागलीये. अजितदादा माळेगाव सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष होते. त्यांच्या निधनानंतर अजितदादांकडील सर्व पदं सुनेत्रा पवारांना द्यावीत अशी मागणी पुढं आली होती. सुनेत्रा पवारांची संचालकपदी बिनविरोध निवड झाल्यानंतर आता पुढच्या काळात रिक्त झालेलं अध्यक्षपदही सुनेत्रा पवारांना मिळणार का याची उत्सुकता लागलीये.
