4 डोंगरांच्या मध्ये दडलेलं गाव, गावात दोन्ही बाजूला पाण्याने वेढलेले चमत्कारिक शिव मंदिर, कोकणातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र

भारतात एकूण 108 तीर्थस्थाने आहेत. यापैकी अनेक तीर्थक्षेत्र आपल्या महाराष्ट्रात आहेत. चार डोंगरांच्या मध्ये आणि दोन्ही बाजूला पाण्याने पाण्याने वेढलेले चमत्कारिक शिव मंदिर कोकणात आहे. हे शिव मंदिर कोकणातील हरिहरेश्वरमध्ये आहे. हरिहरेश्वर मंदिर हे  रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन तालुक्यात अरबी समुद्राच्या किनाऱ्यावर वसलेले एक प्राचीन आणि पवित्र तीर्थक्षेत्र आहे. “दक्षिणकाशी” म्हणून प्रसिद्ध असलेले हे मंदिर पेशव्यांचे कुलदैवत आहे. दोन्ही बाजूला पाण्याने पाण्याने वेढलेले कोकणातील चमत्कारिक मंदिर कधीच संकटात सापडत नाही. कोकणातील हे ठिकाण  महाराष्ट्रातील देवभूमी म्हणून देखील ओळखले जाते.

सावित्री नदी जिथे अरबी समुद्राला मिळेत त्याच संगमवार वसलेलं हरिहरेश्वर हे सुंदर गाव

श्री हरिहरेश्वर मंदिर असे या मंदिराचे नाव आहे. रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन तालुक्यातील श्री हरिहरेश्वर मंदिर दक्षिण काशी क्षेत्र म्हणूनही ओळखले जाते. हिरव्यागार वनराईने नटलेला डोंगर समोर, समुद्रकिनारे डोलणाऱ्या नारळी-पोफळीच्या बागा आणि पांढऱ्या शुभ्र वाळूचा अथांग समुद्र. याच समुद्र किनाऱ्याजवळ  श्री हरिहरेश्वर हे तीर्थ क्षेत्र आहे. राज्याच्या कानापोऱ्यातून भाविक येथे श्री हरिहरेश्वराच्या दर्शनासाठी येतात.  सावित्री नदी जिथे अरबी समुद्राला मिळेत त्याच संगमवार हरिहरेश्वर हे सुंदर गाव वसलेले आहे. हरिहरेश्वर, कालभैरव योगेश्वरी, सिद्धिविनायक व हनुमान अशी चार मंदिरे तसेच समुद्रकिनारी असणारे विष्णूपद, गायत्रीतीर्थ, वक्रतीर्थ, सूर्यतीर्थ, यज्ञकुंड, विष्णूतीर्थ अशी अनेक मंदिरे आहेत. हरिहरेश्वरच्या दक्षिण दिशेला आणि उत्तर दिशेला बारा ज्योतिर्लिंगांची स्थाने आहेत. देशात ऐकूण 108 तीर्थस्थाने असली तरी प्रमुख तीर्थ हरिहरेश्वर मध्ये आहे असे मानले जाते.

दोन्ही बाजूने पाण्याने वेढलेले शिवमंदिर

ब्रह्मगिरी, विष्णूगिरी, शिवगिरी, पार्वती या चार टेकड्यांच्या  कुशीत हरिहरेश्वर हे गाव वसलेले आहे. गावाच्या उत्तरेकडे हरिहरेश्वराचे देऊळ आहे.  श्री हरिहरेश्वर हे शिवस्थान पेशव्यांचे कुलदैवत आहे. येथे असलेली काळभैरव आणि श्री योगेश्वरी यांची मंदिरे देखील महत्त्वाची स्थाने आहेत. हे मंदिर शिवकालीन असावे असा अंदाज आहे. बांधकामाच्या निश्चित कालखंडाची कोणतीच नोंद नाही  पहिल्या बाजीरावाने 1723 मध्ये या जोर्नोद्धार केल्याचे सांगितले जाते. देवाच्या दर्शनानंतर प्रदक्षिणेचा मार्ग डोंगर आणि समुद्राजवळच्या खडकांवरून जातो. या मंदिराचे खास वैशिष्ट्य म्हणजे दोन्ही बाजूने पाण्याने वेढलेले असले तरी कितीही मोठी आपत्ती आली तरी या मंदिराला काहीच होत नाही.

हरिहरेश्वरला जायचे कसे

हरिहरेश्वर हे मुंबईपासून सुमारे 230 किलोमीटर तर पुण्याहून जवळपास 180 किलोमीटर अंतरावर आहे.  एस.टी. बस किंवा खासगी वाहनाने येथे जाता येते. पुण्याहून मिळशी, भोरवरून महाड मार्गे, वाई वरून महाबळेश्वर मार्गे येथे जाता येते. कोकण रेल्वेने गेल्यास  माणगाव हे जवळचे रेल्वे स्टेशन आहे.
रस्त्याने (By Road)
मुंबईहून अंतर: सुमारे 210 किमी
पुण्याहून अंतर: सुमारे 170 किमी
मुंबई – पनवेल – महाड – माणगाव – श्रीवर्धन – हरिहरेश्वर असा मार्ग घेतला जातो.
गाडीसाठी प्रशस्त रस्ता असून गाडीने 5-6 तासांचा प्रवास होतो.
रेल्वेने (By Train)
सर्वात जवळचे रेल्वे स्टेशन: माणगाव (Konkan Railway)
माणगावहून हरिहरेश्वर सुमारे 60 किमी आहे. स्टेशनवरून तुम्ही कॅब, रिक्षा किंवा एसटी बस घेऊ शकता.
बसने (By Bus)
मुंबई, पुणे, पनवेल, महाड इत्यादी ठिकाणांहून MSRTC (एसटी) किंवा खाजगी बसेस श्रीवर्धनपर्यंत उपलब्ध आहेत.
श्रीवर्धनहून हरिहरेश्वर हे अवघ्या 18-20 किमीवर आहे.
फेरी बोटने (By Ferry Route):
दापोलीहून येताना दाभोळ ते धोपावे फेरीने पार करून पुढे हरिहरेश्वरपर्यंत पोहोचता येते.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *