धक्कादायक! आधी प्रेयसीला केलं ठार, नंतर तिच्या मृतदेहासह गाडीत बसून…; ‘व्हॅलेंटाइन डे’च्या दिवशीच शहर हादरलं

व्हॅलेंटाइन डेला एकीकडे प्रेमी युगुलं, जोडपी एकमेकांप्रती प्रेम व्यक्त करत असताना, एक हादरवणारी घटना समोर आली आहे. व्हॅलेंटाइन डेच्या दिवशीच एका प्रियकराने आपल्या प्रेयसीची हत्या केली आहे. प्रियकराने आधी आपल्या प्रेयसीला ठार केलं आणि नंतर स्वत:वर गोळी झाडून घेत आत्महत्या केली. पोलिसांनी कारचे दरवाजे उघडून पाहिले तेव्हा दोघेही मृतावस्थेत होते. कार एका ठिकाणी पार्क करण्यात आली होती. प्राथमिक तपासात आधी हत्या आणि नंतर आत्महत्या केल्याचा अंदाज आहे. नोएडामध्ये ही घटना घडली आहे.

नोएडाच्या सेक्टर-39 पोलिस स्टेशनच्या अख्यारित येणाऱ्या सेक्टर 107 मधील दादरी रोडवरील पिलर क्रमांक 84 जवळ एक कार पार्क करण्यात आली होती. या कारमध्ये दोघांचे मृतदेह आढळले. दोघेही नातेसंबंधात असावेत असं पोलिसांनी सांगितलं आहे. पोलिसांनी सांगितले की, माहिती मिळाल्यानंतर पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि दरवाजे उघडून पाहिले असता आतमध्ये दोघे मृतावस्थेत आढळले. गाडीतून एक पिस्तूल जप्त करण्यात आलं आहे. कार आतून लॉक करण्यात आली होती. पोलिसांच्या माहितीननुसार, प्रथमदर्शनी ही आत्महत्या दिसत आहे.

“कारमध्ये एक तरुण आणि तरुणी डोक्याला गोळी लागलेल्या अवस्थेत आढळले आहेत. तरुणाच्या हातात पिस्तूल होतं. कार आतमधून लॉक करण्यात आली होती. प्रथमदर्शनी, ही आत्महत्या दिसत आहे,” असं अतिरिक्त पोलिस उपायुक्त (नोएडा) मनीषा सिंह यांनी पीटीआयला सांगितलं आहे.

तरुण आणि तरुणीची ओलख पटली आहे. तरुण दिल्लीत त्रिलोकपुरीचा तर तरुणी नोएडाच्या सलारपूरमधील सेक्टर 101 ची रहिवासी आहे. दोन्ही कुटुंबांना कळवण्यात आलं असून, मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत. वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि फॉरेन्सिक टीमने घटनास्थळाची पाहणी केली असून, पुढील तपास सुरु आहे.

प्राथमिक तपासात हा हत्या आणि आत्महत्येचा प्रकार दिसत आहे. तरुणीने प्रथम तरुणीची हत्या केली आणि नंतर पिस्तूल स्वतःकडे वळवली. इंडिया टुडेच्या वृत्तानुसार, तरुणीने एक चिठ्ठी देखील मागे सोडली आहे. ज्यामध्ये त्याने म्हटलं आहे की, तो आणि ती तरुणी गेल्या 15 वर्षांपासून डेटिंग करत होते आणि तरुणीने त्याच्याशी लग्न करण्याचे वचन दिले होते. तथापि, नंतर त्याला कळलं की ती दुसऱ्या कोणाशी तरी लग्न करणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *