घोर कलियुग! 17 वर्षाच्या मुलीची प्रसुती, नऊ महिन्यांनी समजलं की, घरातले शेतात गेल्यावर… महाराष्ट्र हादरवणारी घटना

शहादा तालुक्यातील म्हसावद येथे एक धक्कादायक घटना उघड झाली. अल्पवयीन युवती गर्भवती राहिल्यानंतर तिला म्हसावद येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान संबंधित पीडित युवतीने एका मुलाला जन्म दिला. प्रसूतीनंतर वैद्यकीय तपासणी आणि चौकशीदरम्यान तब्बल नऊ महिन्यांपूर्वी सख्ख्या भावाकडूनच तिच्यावर लैंगिक अत्याचार झाल्याची गंभीर बाब उघडकीस आली आहे.

रुग्णालय प्रशासनाला घटनेची माहिती मिळताच त्यांनी तातडीने पोलिसांना कळविले. त्यानुसार म्हसावद पोलिसांनी रुग्णालयात धाव घेऊन पीडितेचा जबाब नोंदविला. त्यानंतर म्हसावद पोलिस ठाण्यात अधिकृत फिर्याद दाखल करण्यात आली आहे. घटनेमुळे परिसरात संतापाची लाट उसळली असून नातेसंबंधांना काळिमा फासणारी ही घटना असल्याची प्रतिक्रिया नागरिकांकडून व्यक्त होत आहे. दरम्यान घरातील सर्व सदस्य शेतात कामासाठी गेलेले होते. त्यामुळे घरामध्ये पीडित अल्पवयीन युवती आणि तिचा भाऊ हे दोघे होते.

जीवे ठार मारण्याची धमकी देत भावानेच आपल्या १७ वर्षीय बहिणीवर अत्याचार केला. त्यानंतर देखील त्याने वेळोवेळी सदर युवतीवर अत्याचार केला. ही घटना जुन २०२५ मध्ये घडली होती. या प्रकरणी संशयित आरोपी सख्ख्या भावाविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम ६४, ६४ (२) (एफ) (एम), ३५१ (२) (३) तसेच बालकांचे लैंगिक अपराधांपासून संरक्षण (POCSO) कायद्यांतर्गत कलम ४, ५ (जे) (२), ५ (एल), ५ (एन), ६, ८ व १२ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गंभीर स्वरूपाच्या या गुन्ह्यामुळे आरोपीस कठोर शिक्षेची तरतूद आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *