मुंबईत 19 वर्षीय तरुणीचं धक्कादायक कृत्य; 10 वीतील मुलाला घरी बोलावून जबरदस्तीने शारीरिक संबंध, आता चांगलीच गोत्यात!

लहान मुलांशी संबंधित अत्याचाराच्या घटना वाढत असतानाच मुंबई शहरातील पूर्व उपनगरात धक्कादयाक घटना समोर आली आहे. एका १६ वर्षांच्या अल्पवयीन मुलाने केलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी 19 वर्षीय तरुणीविरुद्ध लहान मुलांचे लैंगिक गुन्ह्यांपासून संरक्षण (पोक्सो) कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या तरुणीने धमकावत जबरदस्ती केल्याचा आरोप अल्पवयीन मुलाने केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबई पूर्वी उपनगरातील आरोपी 19 वर्षीय तरुणीने पहिल्यांदा 23 ऑगस्ट 2024 रोजी घरात एकटी असल्याचे कारण देत पीडित अल्पवयीन मुलाला बोलावून घेतलं. यावेळी तिने आधी मुलाला तिच्यासोबत बोलण्यात गुंतवण्याचा प्रयत्न केला. मात्र तो ऐकत नसल्याचं पाहून तरुणीने जबरदस्तीने त्याच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप मुलाने तक्रारीत केला आहे.

या पहिल्या भेटीचा हवाला देत धमकावत आरोपी तरुणीने नंतरही अनेकदा पीडित मुलाला आपल्या जाळ्यात ओढलं. पहिल्या भेटीवरून ब्लॅकमेल करत नंतर अनेक वेळा तिने अल्पवयीन मुलासोबत गैरकृत्य केल्याचे तक्रारीत नमूद आहे. नंतर मुलाने तिला टाळण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यावेळी तिने सोबत येण्यासाठी दबाव टाकत शारीरिक संबंध प्रस्थापित केल्याचा आरोप आहे. अल्पवयीन मुलाने पोलीस ठाण्यात धाव घेतल्यानंतर त्याच्यासोबत शारीरिक संबंध प्रस्थापित केल्याच्या आरोपावरून पोक्सो कायद्याअंतर्गत १९ वर्षीय आरोपी तरुणीवर गुन्हा दाखल केल्याचे पोलिसांनी सांगितले.

दरम्यान, मागील काही वर्षांपासून अल्पवयीन मुला-मुलींशी संबंधित लैंगिक अत्याचाराचे प्रकार वाढीस लागले आहेत. ओळखीच्या व्यक्तींकडूनच लहानग्यांना फसवून त्यांच्यावर अत्याचार केल्याच्या अनेक घटना उघडकीस आल्या आहेत. अशातच आता तरुणीने एका अल्पवयीन मुलाला आपल्या जाळ्यात ओढत नंतर त्याच्यावर जबरदस्तीने शारीरिक संबंध प्रस्थापित केल्याची घटना समोर आल्याने संताप व्यक्त केला जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *