आपली मुलं शाळेत जातात, नियमित खासगी कोचिंग क्लासेसला जातात. यापुढेही जाऊन नेमकं ते विचार तरी काय करतात? त्यांच्या मनात तरी काय चालू असतं? यावर आता लक्ष देण्याची वेळ आली आहे. कारण बुलढाणा शहरातील छत्रपती नगर परिसरात आठव्या वर्गात शिकणाऱ्या 13 वर्षीय विद्यार्थ्याने घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना काल बुधवारी सकाळी उघडकीस आली. या घटनेनं शहरात व परिसरात हळहळ व्यक्त होत असून आत्महत्येचं कारण मात्र अद्याप अस्पष्ट आहे.
घरी गेल्यावर घटनेचा उलगडा
मृत विद्यार्थी हा भारत विद्यालयात आठवीत शिक्षण घेत होता. त्याचे वडील हे वडोदा तांगडा येथे शिक्षक म्हणून शाळेच्या सहलीसाठी बाहेरगावी गेले होते. आई या धावडा येथील आश्रम शाळेत सहशिक्षिका आहेत. काल बुधवारी सकाळी आई शाळेसाठी निघाल्यानंतर मुलगा ट्युशनला गेला होता. सुमारे 10 वाजता तो घरी परतला. मात्र, चाचणी परीक्षा असूनही तो शाळेत गेला नाही. वर्ग शिक्षकांनी अनुपस्थितीबाबत वडिलांना संपर्क साधल्यानंतर शेजाऱ्यांना घरी पाहणी करण्यास सांगण्यात आलं. त्याच्या घरी चौकशी केली असता मुलाचा मृतदेह अभ्यासाच्या खोलीत छताला लटकलेला अवस्थेत आढळून आला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला.
ज्या पद्धतीने या विद्यार्थ्याचा मृत्यू झाला आहे. आई-वडील दोन्हीही शिक्षक असताना आणि अत्यंत कोवळ्या वयात पोटच्या मुलाने उचललेलं टोकाचं पाऊल, यामुळे कुटुंबावर शोककळा पसरली आहे. यापूर्वी किंवा त्याच्या वर्गातल्या मित्रांकडून आता सर्व बाबी तपासून पोलीस या प्रकरणाची तपासणी करणार आहेत.
मोठा अधिकारी होण्याचं अनिकेतचं स्वप्न अधुरंच
दिवसभर कष्टाने काम करायचं आणि रात्री शिक्षण घेत स्पर्धा परीक्षेतून अधिकारी होण्याचं स्वप्न उराशी बाळगणाऱ्या बुलढाणाच्या एका विद्यार्थ्याचा सुसाट कारच्या धडकेत मृत्यू झाला. तर दुसरा तरुण गंभीर जखमी झाला. संभाजीनगर येथील हर्सुलमधील जुना जकात नाका येथे हा अपघात झाला. याप्रकरणी पोलिसांत कार चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हर्सुलजवळील जुना जकात नाक्याजवळ भरधाव कारने उडवलेल्या भीषण अपघातात बुलढाणा जिल्ह्यातील 23 वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू झाल्यानं संताप व्यक्त होत आहे.
