माझ्या लेकीचं लग्न ठरलं! सुप्रिया सुळेंची पोस्ट, जावई-सासरे बाँडिंगचा फोटो शेअर करत काय म्हणाल्या?

राष्ट्रवादी काँग्रेस : शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी लेकीचं लग्न ठरल्याची अधिकृत घोषणा केली आहे. रेवती सदानंद सुळे लवकरच विवाहबंधनात अडकणार आहेत. सारंग अरुण लखानी यांच्यासोबत रेवती लग्नगाठ बांधणार असून त्या नागपूरच्या सूनबाई होणार आहेत.

सुप्रिया सुळे यांची पोस्ट काय?

आम्हाला सांगण्यास अतिशय आनंद होत आहे, की आमची मुलगी रेवती सुळे ही वंदना आणि अरुण लखानी यांचा मुलगा सारंग याच्याशी लग्न करणार आहे, अशी पोस्ट सुप्रिया सुळे यांनी इन्स्टाग्रामवर शेअर केली आहे. अरुण लखानींचे सुपुत्र सारंगसोबत रेवती यांचे अरेंज मॅरेज होत आहे.

बातमी शेअर करताना सुप्रिया सुळेंनी तीन फोटोही शेअर केले आहेत. त्यापैकी दोन फोटो हे रेवती आणि सारंग यांचे आहेत. तिसऱ्या फोटोत सासरे आणि जावईबापूंचं बाँडिंग पाहायला मिळत आहे. सारंग आणि सुप्रिया यांचे पती सदानंद सुळे यांचा टेनिस कोर्टवरील मॅचनंतरचा एक फोटो शेअर करण्यात आला आहे

रेवती सुळेंचं लग्न ठरल्याची चर्चा काल दिवसभर समाजमाध्यमांतून रंगली होती. मात्र सुळे, पवार किंवा लखानी कुटुंबातून अधिकृत भाष्य करण्यात आले नव्हते. माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या कन्या आणि निर्मात्या स्मृती शिंदे यांनी इन्स्टाग्राम पोस्टच्या माध्यमातून रेवती सुळेंच्या लग्नाविषयी माहिती दिली. शिंदे आणि पवार कुटुंबाची जवळीक असल्याने या बातमीवर जवळपास शिक्कामोर्तब होतेच.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *