सासूचे अनैतिक संबंध; भलत्या मागणीमुळे सुनेने आयुष्य संपवलं, पाटील कुटुंबात काय घडलं?

सासरच्या मंडळींनी वेश्या व्यवसायात ढकलण्याचा प्रयत्न केल्यामुळे विवाहितेने आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. कर्नाटकातील बिदरमध्ये हा माणुसकीला कलंक लावणारा प्रकार घडला. विवाहितेच्या आई वडिलांनी केलेल्या गंभीर आरोपांनंतर या प्रकरणी पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

२५ वर्षांच्या अंजनबाई शेखर पाटील हिने शुक्रवारी दुपारच्या सुमारास सासरी गळफास घेऊन आत्महत्या केली. अंजनबाईचे वडील विजय कुमार यांनी तिचा नवरा शेखर पाटील, सासू अरुणाबाई आणि सासरे चंद्रकांत पाटील यांच्याविरोधात तक्रार दाखल केली आहे.

विजयकुमार यांनी सांगितलं की त्यांची मुलगी अंजनबाई हिचा विवाह २०२२ मध्ये बिदर येथील शेखर पाटील याच्याशी झाला. शेखर पाणीपुरी विकण्याचं काम करायचा. तो रात्री उशिरा घरी यायचा. जेव्हा अंजनबाईने त्याला लवकर येण्याचा तगादा लावला, तेव्हा दोघांमध्ये भांडणं होऊ लागली. त्यानंतर सासू-सासऱ्यांशीही तिचे खटके उडू लागले.

अंजनला चांगलं जेवण बनवता येत नाही, ती चांगली नाही, असं तिचे सासू-सासरे तिला म्हणत असत, असं विजयकुमार यांनी सांगितलं. ‘माझ्या मुलीने मला सांगितलं होतं, की तिची सासू अरुणबाई हिचे अनैतिक संबंध आहेत. सासू माझ्या मुलीला वेश्याव्यवसाय करण्यास दबाव टाकत होती. त्यामुळे माझ्या मुलीच्या मृत्यू प्रकरणात सासरच्या मंडळींवर संशय आहे’ असं विजय कुमार म्हणाले.

माझ्या मुलीने आत्महत्या केली कारण ती आता तिचा पती आणि सासरच्या लोकांकडून होणारा मानसिक आणि शारीरिक छळाला, तसेच बेकायदेशीर कृत्यांमध्ये सहभागी होण्यासाठी केलेला दबाव सहन करू शकत नव्हती. पोलिसांनी आता तक्रारीच्या आधारे प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *