राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आज मुंबईमध्ये आहेत. मंत्रिमंडळाच्या बैठकीला त्या उपस्थित राहणार असून उपमुख्यमंत्री झाल्यानंतरची ही त्यांची पहिलीच कॅबिनेट बैठक असणार आहे. दुसरीकडे पुण्यामध्ये शरद पवारांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्यांची प्रकृती स्थीर आहे. त्यांच्या प्रकृतीसंदर्भातील अपडेट्सवर लक्ष असणार आहे. तसेच रोहित पवार आज अजित पवारांच्या विमान अपघातासंदर्भात पत्रकार परिषद घेणार असून ते काय बोलतात याकडे लक्ष असणार आहे. याशिवाय दिवसभरातील ताज्या घडामोडींचे अपडेट्स आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत.
