किंमत कमी होणार वगैरे गैरसमजच? सोन्याचे आजचे दर पाहून डोकंच धराल, चांदीनंही फोडला घाम!

अनेकांसाठीच एक सुरक्षित गुंतवणुकीचा पर्याय म्हणून सोनं कायमच मदतीचं ठरलं आहे. अशा या मौल्यवान धातूच्या दरांचा आलेख मागील कैक दिवसांपासून चढत्या क्रमानंच वर जात असून आता चांदीसुद्धा या दरवाढीला अपवाद ठरलेली नाही. ‘सेफ हेवन असेट’ म्हणून सोनं आणि चांदीच्या दरात वाढ होणं सुरूच असून काही दिवसांपूर्वी या धातूंमध्ये झालेली घट अनेकांसाठीच त्यांच्या खरेदीमागचं कारण ठरली. मात्र पुन्हा एकदा सोनं आणि चांदीच्या दरात वाढ झाली आहे.

यांची असली तरीही एकत्रितपणे हा आकडा प्रचंड मोठा ठरत आहे. मागील दोन दिवसांमध्ये सोन्याचे दर 10 ग्रॅममागे ₹1320 (24 कॅरेट) आणि 22 कॅरेट सोन्याचे दर ₹1210 रुपयांवर पोहोचले. फक्त सोनंच नव्हे, तर चांदीचे दर प्रतिकिलोमागे पुन्हा एकदा वाढले असून जोन दिवसांत चांदी ₹15,100 नी महागली आहे.

देशातील महत्त्वाच्या शहरात काय आहेत सोन्याचे दर? (प्रतितोळा अनुक्रमे 24 आणि 22 कॅरेट)

दिल्ली- ₹1,58,070 / ₹1,44,910
मुंबई- ₹1,57,920 / ₹1,44,760
कोलकाता- ₹1,57,920 / ₹1,44,760
बंगळुरू- ₹1,57,920 / ₹1,44,760
अहमदाबाद- ₹1,57,970 / ₹1,44,810

सोन्यामागोमाग चांदीचे दरही का वाढले?

एक दिवस दर स्थिर राहिल्यानंतर चांदीनंसुद्धा भाव धरला. 10 फेब्रुवारी 2026 रोजी हे दर ₹3,01,100 प्रतिकिलोग्राम इतकी उंची गाठताना दिसली. ज्यामध्ये प्रतिग्राम ₹100 रुपयांची वाढ पाहायला मिळाली.

सोनं- चांदीच्या दरवाढीबाबत तज्ज्ञ काय म्हणतात? 

सोनं आणि चांदीचे दर निर्धारित करत असताना अमेरिकेचा दरडोई उत्पन्न दर, नॉन फॉर्म पॅरोल, महागाई दर, जर्मनी, चीन आणि भारतातील महागाई दर, फेडरल रिझर्व्हच्या व्याजदरांतील कपातीचा परिणामही सोनं- चांदीच्या दरावर परिणाम पाडताना दिसत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *