वाहनावरील नियंत्रण सुटलं, आडोशी बोगद्याच्या तोंडाशी टँकर पलटी, मुंबई-पुणे एक्सप्रेस-वेवर वाहतूक ठप्प; पर्यायी मार्ग कोणता?

मुंबई–पुणे द्रुतगती महामार्गावर काल मंगळवारी सायंकाळी आडोशी बोगद्याजवळ घडलेल्या गंभीर अपघाताने एकच खळबळ उडवून दिली. अत्यंत ज्वलनशील प्रोपलीन गॅस वाहतूक करणारा टँकर बोगद्याच्या प्रवेशद्वाराजवळ उलटल्याने मोठ्या दुर्घटनेचा धोका निर्माण झाला. अपघातानंतर टँकरमधून गॅस गळती सुरू झाल्याने खबरदारीचा उपाय म्हणून मुंबईकडे जाणारी वाहतूक तात्काळ थांबविण्यात आली. परिणामी द्रुतगती मार्गावर भीतीचं वातावरण पसरले असून महामार्ग पूर्णपणे ठप्प झाला होता. वाहतूक 15 तासांपासून ठप्प असल्याची माहिती समोर आली आहे.

टँकर थेट बोगद्याच्या तोंडाशी पलटी

पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सदर टँकर पुण्याहून मुंबईच्या दिशेने येत होता. आडोशी बोगद्याजवळील अवघड वळणावर चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने टँकर थेट बोगद्याच्या तोंडाशी पलटी झाला. अपघातानंतर काही वेळातच टँकरमधून प्रोपलीन गॅसची गळती सुरू झाली. हा गॅस अत्यंत ज्वलनशील असल्याने कोणताही अपघात किंवा ठिणगी मोठ्या स्फोटाला कारणीभूत ठरू शकते, अशी भीती व्यक्त करण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *