नगरजवळ अपघातात 4 जणांचा मृत्यू

नगर-दौंड रस्त्यावरील चिखली येथे आज (मंगळवार) सकाळी पिकअप व्हॅन आणि कंटेनरमध्ये झालेल्या अपघातात चौघांचा मृत्यू झाला आहे. तर, 21 जण जखमी आहेत.
 
मिळालेल्या माहितीनुसार, चिखली येथे पिकअप व्हॅन भाविकांना घेऊन जात असताना कंटेनरने धडक दिली. या मध्ये पिकअपमधील चौघांचा जागीच मृत्यू झाला. तर, 21 जण जखमी झाले असून, त्यांना नगरमधील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. पोलिस घटनास्थळी दाखल झाले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *