अजित पवारांशिवाय महाराष्ट्राचं राजकारण, समाजकारण बेचव अन् अळणी – संजय राऊत

महाराष्ट्राला आणखी काय पाहावं लागणार आहे…’ अशी उद्विग्न प्रतिक्रिया खासदार संजय राऊत यांनी अजित पवारांना वाहिली श्रद्धांजली दिली आहे.  संजय राऊतांनी सांगितलं की, जेव्हा अपघाताची माहिती आली तेव्हा आम्ही सगळे प्रार्थना करत होतो. अजित पवार सही सलामत अपघातातून बाहेर यावेत. पण जे नको होतं तेच घडलं. अजित पवारांचा अपघाती मृत्यू झाला. अजित पवार यांनी बारामतीमधून राजकारणाला सुरुवात केली आणि बारामतीतच त्यांचा अपघाती मृत्यू झाला आहे. ही अतिशय दुःखद बातमी आहे.

सामाजिक जीवनातील आजचा काळा दिवस आहे. सकाळी अजित पवारांच्या विमानाचा अपघात झाल्याची माहिती समजल्यानंतर आम्ही सगळे प्रार्थना करत होता. मात्र दु:खद बातमी समोर आली. अजित पवारांशिवाय महाराष्ट्रातील राजकारण बेचव, अळणी होईल, दिलखुलास, रोखठोक, सर्वांना हवंहवंस व्यक्तीमत्व होतं. त्यांच्या जाण्याने महाराष्ट्रावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे, अशी प्रतिक्रिया शिवसेना खासदार संजय राऊतांनी दिली आहे.

अजित पवारांच्या अचानक जाण्याने महाराष्ट्राला मोठा धक्का बसला आहे. अजित पवारांसह ६ जणांचा मृत्यू झाला आहे. आज अजित पवारांच्या बारामतीमध्ये तीन सभा होत्या. जिल्हा परिषद, तसंच पंचायत समिती निवडणुकांसंबंधीत या सभा होत्या. सभांसाठीच ते मुंबईतून बारामतीमध्ये येत होते. बारामतीमध्ये दाखल झाल्यानंतर लँडिंगवेळीच त्यांच्या विमानाला अपघात झाला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *