आईचे प्रेम हे जगात सर्वात पवित्र मानले जाते. मात्र, या नात्यालाच काळिमा फासणारी एक अत्यंत हृदयद्रावक घटना पुण्याच्या वाघोली परिसरात घडली आहे. जन्मदात्या आईनेच आपल्या 11 वर्षांच्या चिमुकल्याचा गळा चिरून निर्घृण खून केला, तर 13 वर्षांच्या मुलीलाही जीवे मारण्याचा प्रयत्न केला. सुदैवाने मुलगी या हल्ल्यातून बचावली असली तरी तिची प्रकृती चिंताजनक आहे. वाघोलीत गेल्या दोन दिवसांत घडलेली ही दुसरी मोठी घटना असल्याने संपूर्ण परिसर सुन्न झाला आहे. नेमकी घटना काय? पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वाघोलीतील बीएआयएफ (BAIF) रोड परिसरात ही थरारक घटना उघडकीस आली. सोनी संतोष जायभाय असं आरोपी मातेचं नाव आहे. रागाच्या भरात किंवा मानसिक तणावातून सोनी हिने आपला 11 वर्षीय मुलगा साईराज संतोष जायभाय याच्या गळ्यावर वार करून त्याची हत्या केली. त्यानंतर तिने आपली 13 वर्षीय मुलगी धनश्री हिच्यावरही प्राणघातक हल्ला चढवला.

आईचे प्रेम हे जगात सर्वात पवित्र मानले जाते. मात्र, या नात्यालाच काळिमा फासणारी एक अत्यंत हृदयद्रावक घटना पुण्याच्या वाघोली परिसरात घडली आहे. जन्मदात्या आईनेच आपल्या 11 वर्षांच्या चिमुकल्याचा गळा चिरून निर्घृण खून केला, तर 13 वर्षांच्या मुलीलाही जीवे मारण्याचा प्रयत्न केला. सुदैवाने मुलगी या हल्ल्यातून बचावली असली तरी तिची प्रकृती चिंताजनक आहे. वाघोलीत गेल्या दोन दिवसांत घडलेली ही दुसरी मोठी घटना असल्याने संपूर्ण परिसर सुन्न झाला आहे.

नेमकी घटना काय?

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वाघोलीतील बीएआयएफ (BAIF) रोड परिसरात ही थरारक घटना उघडकीस आली. सोनी संतोष जायभाय असं आरोपी मातेचं नाव आहे. रागाच्या भरात किंवा मानसिक तणावातून सोनी हिने आपला 11 वर्षीय मुलगा साईराज संतोष जायभाय याच्या गळ्यावर वार करून त्याची हत्या केली. त्यानंतर तिने आपली 13 वर्षीय मुलगी धनश्री हिच्यावरही प्राणघातक हल्ला चढवला.

लेक मृत्यूशी झुंज देतेय

या भयंकर हल्ल्यात साईराजचा जागीच मृत्यू झाला, तर धनश्री गंभीर जखमी झाली आहे. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या धनश्रीला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले असून तिच्यावर उपचार सुरू आहेत. जायभाय कुटुंब हे मूळचे नांदेड जिल्ह्यातील कंधार तालुक्यातील असून, पोटापाण्यासाठी ते वाघोली येथे स्थायिक झाले होते.

पोलिसांकडून महिलेला अटक, कारण अस्पष्ट

घटनेची माहिती मिळताच वाघोली पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत आरोपी सोनी जायभाय हिला ताब्यात घेतले आहे. मात्र, एका आईने आपल्याच पोटच्या मुलांना संपवण्याचे टोकाचे पाऊल का उचलले? याचे गूढ अद्याप उकललेले नाही. कौटुंबिक वाद, आर्थिक विवंचना की मानसिक आजार? पोलीस या सर्व बाजूंनी कसून तपास करत आहेत.

वाघोलीत गुन्हेगारीचा आलेख वाढला

वाघोली परिसरात गेल्या 48 तासांतील ही दुसरी गंभीर घटना आहे. सलग घडणाऱ्या या गुन्हेगारी प्रकारांमुळे स्थानिक रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. पोलिसांचा गुन्हेगारांवर वचक राहिला नसल्याची चर्चा नागरिकांमध्ये सुरू असून, पोलीस प्रशासनाने गस्त वाढवून कडक कारवाई करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास वाघोली पोलीस करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *