मुख्यमंत्री फडणवीसांचा डंका पाहायला मिळाला. वर्ल्ड इकॉनॉमिक फोरममध्ये पहिल्या दिवशी लाखो कोटींचे करार झालेत. महाराष्ट्रात रेकॉर्ड ब्रेक गुंतवणुकीसाठी विविध कंपन्यांसोबत फडणवीस सरकारने हे करार केलेत. फडणवीसांच्या नेतृत्वात लाखो कोटी रुपयांच्या गुंतवणुकीसाठी सामंजस्य करार करण्यात आलेत. महाराष्ट्रात1450000000000 रुपयांची महागुंतवणूक झाली. 15 लाख लोकांना जॉब मिळणार आहेत. यातील सर्वाधित प्रकल्प हे कोकणातील आहेत.
हरित ऊर्जा, अन्न प्रक्रीया, पोलाद निर्मिती, आयटी-आयटीईस, डाटा सेंटर्सह ईव्ही- ऑटोमोबाईल, रत्नागिरी येथे जहाज बांधणी, डीजिटल इन्फ्रा अशा विविध क्षेत्रातील ही गुंतवणूक आहे. मुंबईसह राज्याच्या रत्नागिरी, पालघर, गडचिरोली, अहिल्यानगर या भागात पोहचणाऱ असल्याने, तेथे उद्योग वाढीसह मोठ्या प्रमाणा रोजगार निर्मितीला चालना मिळणार आहे.
महाराष्ट्र सरकार आणि येओमन मरीन सर्व्हिसेस प्रा. लि.
एकूण गुंतवणूक: ₹1050 कोटी
रोजगार: 1575
सेक्टर: जहाज बांधणी
प्रदेश: रत्नागिरी/कोकण
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि श्री धनंजय मिश्रा, अध्यक्ष आणि एमडी यांनी स्वाक्षरी केली.
महाराष्ट्र सरकार-काल्सबर्ग
क्षेत्र: अन्न प्रक्रिया आणि कृषी
गुंतवणूक: ५०० कोटी
रोजगार : ७५०
महाराष्ट्र सरकार- योकी ग्रीन एनर्जी प्रा. लि.
क्षेत्र: नविनिकरणीय ऊर्जा
गुंतवणूक: ४ हजार कोटी
रोजगार : ६ हजार
ठिकाण: पालघर/एमएमआर
महाराष्ट्र सरकार-बीएफएन फॉर्जिंग्स
क्षेत्र: स्टील
गुंतवणूक: ५६५ कोटी
रोजगार : ८४७
ठिकाण: पालघर/एमएमआर
एमएमआरडीए-सुमिटोमो रियालिटी
गुंतवणूक: सुमारे ८ बिलियन डॉलर्स
रोजगार : ८० हजार.
एमएमआरडीए-के. रहेजा
गुंतवणूक: सुमारे १० बिलियन डॉलर्स
रोजगार : एक लाख.
एमएमआरडीए-अल्टा कॅपिटल/पंचशील
गुंतवणूक: सुमारे २५ बिलियन डॉलर्स
रोजगार : २ लाख ५० हजार.
एमएमआरडीए-एसबीजी समूह
क्षेत्र: लॉजिस्टिक्स
गुंतवणूक: सुमारे २० बिलियन डॉलर्स
रोजगार : ४ लाख ५० हजार.
एमएमआरडीए-आयआयएसएम ग्लोबल
गुंतवणूक: सुमारे ८ बिलियन डॉलर्स
रोजगार : ८० हजार.
एमएमआरडीए-जायका
धोरण आणि स्ट्रॅटेजी पार्टनर
एमएमआरडीए-सेम्बकॉर्प डेवलपमेंट लि. सिंगापूर
एकीकृत इंडस्ट्रियल पार्कसाठी नॉलेज पार्टनर
एमएमआरडीए-टेक्निकल युनिव्हर्सिटी, मुनीच, जर्मनी
शाश्वत नागरी वाहतूक प्रणाली
महाराष्ट्र सरकार-सुरजागड इस्पात
क्षेत्र: स्टील
गुंतवणूक: २० हजार कोटी
रोजगार: ८ हजार.
ठिकाण: गडचिरोली
महाराष्ट्र सरकार-लोढा डेव्हलपर्स
क्षेत्र: आयटी, डेटा सेंटर्स
गुंतवणूक: १ लाख कोटी
रोजगार: १ लाख ५० हजार.
