त्यांना फोन आल्यावर, ते…’; बायकोची मोठी माहिती, रिक्षाचालकाला संपवलं, बुलढाण्यातील ‘त्या’ प्रकरणात नवी अपडेट

बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर तालुक्यातील शिवनी तालसवाडा रस्त्यावर एका शेताच्या कडेला 35 वर्षीय रिक्षाचालकाचा मृतदेह आढळून आल्याची घटना 8 जानेवारी रोजी उघड आल्यानंतर एकच खळबळ माजली होती. याप्रकरणी मृतकाच्या पतीने दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी एकास अटक केली होती. तर 11 जानेवारी रोजी रात्री सव्वादहा वाजता आणखी एकाला ताब्यात घेण्यात आलं आहे. अटक केलेल्या आरोपीला न्यायालयात हजर केलं असता न्यायालयाने दोन्ही आरोपींना 14 जानेवारीपर्यंत म्हणजे उद्यापर्यंत पोलीस कोठडी सुनावली असल्याची माहिती दसरखेड एमआयडीसी पोलिसांनी दिली.

नेमकी घटना काय?

मिळालेल्या माहितीनुसार, 8 जानेवारी रोजी सकाळी शिवणी-तालासवाडा रस्त्यावर एका शेताच्या कडेला अमोल भाऊराव भवरे (वय 35, रा. धरणगाव, ता. मलकापूर) या रिक्षाचालकाचा मृतदेह आढळून आला होता. यानंतर मृतकाच्या चुलत भावाने एमआयडीसी पोलीस स्टेशनला तक्रार दिल्यावरून मर्ग दाखल करण्यात आला होता. तर मृतकाची पत्नी शितल अमोल भवरे यांनी आपले पती अमोल भवरे हे घरी असताना त्यांना 7 जानेवारी रोजी दिनेश गणेश तायडे (रा. शिवनी) यांचा फोन आला. त्यानंतर ते शेताकडे जात असल्याचं सांगून ऑटो घेऊन निघून गेले. यानंतर दुसऱ्या दिवशी त्यांचा मृतदेह शिवानी ते तालसवाडा रस्त्यावर आढळून आला. त्यांचा गळा आवळला असल्याच्या खुणा आणि त्यांच्या नाका-तोंडातून रक्त येत असल्याचं दिसलं. तसेच तोंडावर दोन्ही हातावर खरचटलेलं दिसलं.

‘दिनेश तायडे यानेच माझे पती अमोल यांची हत्या केली असावी, तसेच त्यांचा मोबाईल त्याने कुठेतरी फेकून दिला आहे’. अशा फिर्यादीवरून पोलिसांनी आरोपी दिनेश गणेश तायडेविरोधात हत्या करून पुरावा नष्ट करण्याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता. तर याप्रकरणी दसरखेड एमआयडीसी पोलिसांनी तपासादरम्यान मिळालेल्या माहितीवरून नामदेव रमेश तायडे (वय 37, रा. शिवनी) याला 11 जानेवारी रोजी ताब्यात घेत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दिनेश तायडे याची पोलीस कोठडी आज संपली असल्यानं व दुसरा आरोपी नामदेव तायडे या दोघांनाही न्यायालयात हजर केले असता त्यांना 14 जानेवारीपर्यंत म्हणजेच उद्यापर्यंत न्यायालयानं पोलीस कोठडी सुनावली असल्याची माहिती एमआयडीसी पोलिसांनी दिली.

मोबाईल करणार घटनेचा उलगडा..!

या सर्व खळबजनक घटनेमध्ये पत्नीने केलेल्या आरोपानुसार आरोपी दिनेश गणेश तायडे यांनी केलेला तो फोन नेमकं त्या फोन मागचं रहस्य काय त्या फोन नंतर असं घडलं तरी काय की ज्यामुळे अमोलचा मृतदेह सापडून आला या दिशेने पोलीस तपास करीत आहे. त्यामुळे या या प्रकरणातील अमोल यांच मोबाईल त्याचे शेवटचे लोकेशन संभाषण हे महत्त्वाचं ठरणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *