बॉयफ्रेंडच्या शहाणपणामुळे TC च्या ताब्यात सापडली तरुणी; AC लोकलमधून अचानक खाली उतरवून…

प्रेमात माणूस काहीही करु शकतो असं म्हणतात. चित्रपटांमध्येही प्रेयसीसाठी अगदी चंद्र, तारे तोडून आणण्याची तयारी असलेले अभिनेते पाहून तरुणाईसुद्धा आपल्या प्रेमासाठी काहीही करायला तयार होतात. मात्र हे काहीही करण्याच्या नादात अनेकदा कायदा हाती घेतला जातो आणि हे अतीप्रेम अंगलट येतं. आसाच काहीसा प्रकार मुंबईतील अंधेरीमध्ये उघडकीस आला आहे. येथील एका इंजिनिअर बॉयफ्रेंडने केलेल्या अतिशहाणपणामध्ये त्याची प्रेयसी टीसीच्या तावडीत सापडली आणि नंतर हे प्रकरण पार पोलिसांपर्यंत गेलं आहे.

नक्की या तरुणाने केलं काय?

या तरुणाने आपल्या प्रेयसीसाठी चक्क खोटं  ‘यूटीएस ॲप’ तयार केल्याचं समोर आलं आहे. प्रेयसीला एसी लोकल ट्रेनने फुकट प्रवास करता यावा या हेतूने हे  ‘यूटीएस ॲप’ तयार करण्यात आलं होतं. वरवर पाहिल्यास या  ‘यूटीएस ॲप’मध्ये काही वेगळा बदल वाटत नव्हता. मात्र अंधेरी रेल्वे स्थानकावर सतर्क महिला टीसीने हे ‘यूटीएस ॲप’ वापरणाऱ्या तरुणीला रंगेहाथ पकडून कारवाई केली आहे.

हे दोघे आरोपी कोण?

वातानुकूलित लोकलचा बनावट पास घेऊन प्रवास करणारी प्रवासी तरुणीबरोबरच बनावट यूटीएस अॅप तयार करून त्यावरून लोकलचे बनावट पास तयार करणारा या तरुणीच्या मित्राविरोधात वांद्रे पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पश्चिम रेल्वेवरील चर्चगेट-विरार दरम्यान नियमित तपासणीत महिला टीसीने एक बनावट यूटीएस लोकल पास पकडला. या बनावट ‘यूटीएस ॲप’वर दिसणारं तिकीट बनावट असल्याची खात्री पटल्यानंतर तिकीट फसवणुकीप्रकरणी वांद्रे रेल्वे पोलिसांनी प्रवासी महिला प्रिती गुप्ता आणि तिचा इंजिनिअर मित्र अनुज गुप्ताविरोधात शुक्रवारी गुन्हा दाखल केला.

नक्की त्या ट्रेनमध्ये घडलं काय?

लोकलचे बनावट तिकीट घेऊन फिरणाऱ्या प्रवाशांमध्ये वाढ होत असल्याचे मागील काही काळापासून दिसून येत आहे. मध्य आणि पश्चिम या दोन्ही रेल्वे मार्गावर फसवणुकीच्या अशा घटना होत आहेत. पश्चिम रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबई सेंट्रलच्या मुख्य तिकीट निरीक्षक (स्पोर्ट्स स्क्वॉड) दीपिका मूर्ती सकाळी 7 ते सकाळी 11 दरम्यान कर्तव्यावर असताना ही घटना उघडकीस आली. शुक्रवारी सकाळी सुमारे 10.20 वाजता अंधेरी रेल्वे स्थानकाच्या फलाट क्रमांक 7 वरून अप जलद चर्चगेट लोकलमधील महिलांच्या प्रथम श्रेणीच्या डब्यात दीपिका मूर्ती तिकीट तपासणी करत होत्या. यावेळी लोकलमध्ये प्रवासी महिला प्रिती गुप्ता हिने तिच्या मोबाइलवरील एक यूटीएस वातानुकूलित लोकल पास दाखवला. ज्यावर 1 जानेवारी 2026 ते 31 जानेवारी 2026 पर्यंतची वैधता दर्शविली होती. मात्र अगदी वर्षाच्या पहिल्या तारखेला काढलेला पास पासून संशयास्पद वाटणाऱ्या त्या तिकीटाबद्दल विचारणा केल्यावर प्रितीने उडवाउडवीची उत्तरे दिली. ज्यामुळे तिकीट निरीक्षकाचा संशय अधिकच बळावला.

वांद्रे रेल्वे स्थानकावर तिला उतरवलं अन्…

प्रितीकडील पासच्या पुढील पडताळणीसाठी तिला वांद्रे रेल्वे स्थानकावर उतरवण्यात आले. त्या तिकीटाची डीसीटीआय कंट्रोलद्वारे चौकशी करण्यात आली आणि त्यांनी खात्री केली की मोबाईलवर दाखवलेला यूटीएस पास बनावट होता. मात्र एवढा गोंधळ झाल्यानंतर त्या महिलेने कबूल केले की तो पास बनावट होता आणि तो तिच्या मित्राने तयार केला होता. त्याने तिला व्हॉट्सॲपद्वारे एक बनावट यूटीएस ॲप्लिकेशन पाठवले होते, अशी माहिती पश्चिम रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली. या दोघांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

एसी लोकलमध्ये विनातिकीट प्रवास करणाऱ्यांकडून 3 कोटींचा दंड वसूल

प्रवाशांचा प्रवास आरामदायी व्हावा आणि प्रवाशांना चांगल्या सेवा सुनिश्चित करण्यासाठी पश्चिम रेल्वेने तिकीट तपासणी मोहीम हाती घेतली आहे. लोकल सेवा, मेल-एक्स्प्रेस, प्रवासी गाड्या आणि सुट्टीच्या विशेष गाड्यामधील तिकीटधारक प्रवाशांचा प्रवास विनाअडथळा व्हावा यासाठी सातत्याने कडक तिकीट तपासणी केली जाते. यातून पश्चिम रेल्वेने एप्रिल ते डिसेंबर या कालावधीत 155 कोटींहून अधिक दंड वसूल केला. तर, फक्त वातानुकूलित लोकलमधून विनातिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांकडून 3 कोटी रुपये दंड वसूल केल. गेल्या नऊ महिन्यात अनेक ठिकाणी तिकीट तपासणी मोहीमा राबवल्या. यामुळे 155.46 कोटी रुपयांची वसुली केली. गेल्या वर्षी याच कालावधीच्या तुलनेत यंदा अंदाजे 49 टक्के वाढ झाली आहे. या रकमेत मुंबई उपनगरीय विभागातून 41.26 कोटी रुपयांची वसुली झाली

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *