विविध औषधांच्या गोळ्या घेताना आपण किती जागरुक राहणं आवश्यक आहे, याचं एक उदाहरण समोर आलं आहे. औषधाच्या गोळीच्या आतमध्ये टाचणीसदृश्य तार सापडल्याचा एक फोटो आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी ट्विटरवर पोस्ट केला आहे.
एखाद्या औषध निर्मिती करणाऱ्या कंपनीची हलगर्जी रुग्णाला किती महागात पडू शकते, याचं ढळढळीत उदाहरण या फोटोतून दिसत आहे. ही गोष्ट दुर्दैवाने घडली, मात्र प्रत्येक वेळी औषध घेताना सतर्क राहायला हवं हा संदेशच त्यांनी ट्विटरवरुन दिला आहे.

