आज २०२६ या वर्षाचा पहिला दिवस. नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी मुंबईकरांना वरुणराजानं पहिलं सरप्राईज दिलं आहे.
1/8

2/8

आज (गुरुवारी) पहाटेपासून मुंबईतील अनेक भागात जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे. ऐन हिवाळ्यात पाऊस पडत असल्याने भल्या सकाळी ऑफिस आणि कामावर जाणाऱ्या नागरिकांची मोठी तारांबळ उडाली आहे.
3/8

हा पाऊस मुंबईकरांसह हवामानशास्त्र विभागासाठी देखील सरप्राईज देणारा ठरला आहे. कारण मुंबईत पाऊस पडेल, असा अंदाज हवामान खात्याकडून देखील देण्यात आला नव्हता.
4/8

आज पहाटे पासून दक्षिण मुंबईतील वरळी, दादर, सायन, चेंबूर ते वाशीपर्यंत अनेक ठिकाणी पावसाने धुव्वादार बॅटींग केली आहे. भल्या पहाटे पाऊस पडल्याने सकाळी कामावर जाणाऱ्या नागरिकांची तारांबळ उडाली.
5/8

संपूर्ण महाराष्ट्रात हिवाळ्याचा जोर वाढत असल्याचं चित्र असताना मुंबईत काही भागांत पावसाची रिपरिप सुरू आहे. अचानक आलेल्या पावसाच्या सरींमुळे मुंबईकर गोंधळून गेले आहेत.
6/8

गेल्या काही दिवसांत राज्यातील अनेक भागांमध्ये किमान तापमानात लक्षणीय घट झाली असून काही ठिकाणी तापमान थेट 10 अंश सेल्सिअसच्या खाली घसरलं आहे. (Weather Update)अधिकृतरीत्या थंडीची लाट जाहीर करण्यात आलेली नसली, तरी तापमानातील घसरणीमुळे सकाळनंतर-संध्याकाळी गारठा अधिक जाणवत आहे.
7/8

मुंबई, कोकण आणि किनारी भागांमध्ये रात्री व पहाटे थंड वारे वाहत असून थंडीची चाहूल लागली आहे. मात्र दुपारच्या सुमारास उन्हाचा ताप वाढल्याने तापमान चढते आणि उष्णता जाणवते. त्यामुळे दिवसा-रात्रीच्या तापमानात मोठा फरक दिसून येत आहे.
8/8

कोकणात देखील काही ठिकाणी पाऊस पडल्याची माहिती आहे. या अवकाळी पाऊसाचा फटका आंबा आणि काजूच्या शेतीला बसू शकतो. सध्या आंब्याला मोहोर फुटला आहे. पावसामुळे आंब्याचं मोठं नुकसान होऊ शकतं.
