तळ्यात पडल्याने विद्यार्थी व शिक्षक दोघांचा मृत्यू

भारतीय कृषी संशोधन परिषद (आयसीएआर) अंतर्गत असलेल्या माळेगाव खुर्द येथील संस्थेच्या परिसरात प्रॅक्टिकल अभ्यासादरम्यान दुर्दैवी घटना घडली. पाण्याचे नमुने घेण्यासाठी गेलेला विद्यार्थी तळ्यात पडला आणि त्याला वाचवण्याच्या प्रयत्नात शिक्षकही तळ्यात पडल्याने विद्यार्थी व शिक्षक अशा दोघांचा मृत्यू झाला. या घटनेत विद्यार्थी के. एस. हरी प्रसाद (वय 23) आणि शिक्षक बी. गोपालकृष्णन (रा. दोघे तामिळनाडू) यांचा समावेश आहे.

वाचवण्याच्या प्रयत्नात शिक्षकाचाही मृत्यू

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विद्यार्थी के. एस. हरी प्रसाद प्रॅक्टिकलसाठी अंतर्गत परिसरातील तळ्याजवळ तळ्यातील पाणी घेण्यासाठी गेला असता पाय घसरून पाण्यात पडला. त्याच्यासोबत असलेल्या विद्यार्थिनी कुमारी कशीश यादव हिने मदतीसाठी आरडाओरडा केला. तो ऐकताच मदतीसाठी धाव घेतलेले शिक्षक बी. गोपालकृष्णन हे देखील त्याला वाचवण्याच्या प्रयत्नात तोल जाऊन तळ्यात पडले.

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत दोघांनाही पोलिस व्हॅनमधून हॉस्पिटल येथे दाखल केले. मात्र, उपचारापूर्वीच डॉक्टरांनी दोघांनाही मृत घोषित केलं. या दुर्दैवी घटनेमुळे आयसीएआर संस्था, विद्यार्थी व संशोधकांमध्ये तीव्र शोककळा पसरली असून सुरक्षिततेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *