8 ते 10 दिवसांपासून बेपत्ता, अचानक बॉडी नाल्यात आढळली; नाशिकमधील माजी जि.प. सदस्यासोबत काय घडलं?

नाशिकच्या पळसे गावात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथील एका नाल्यात गेल्या काही दिवसांपासून बेपत्ता असलेल्या माजी जिल्हा परिषद सदस्याचा मृतदेह हा कुजलेल्या अवस्थेमध्ये मिळून आला आहे. कैलास चौधरी असं मृत माजी सदस्याचं नाव आहे. या घटनेनं एकच खळबळ उडाली आहे. कैलास चौधरी हे गेल्या आठ ते नऊ दिवसांपासून घरातून बेपत्ता होते. याबाबत नाशिकरोड पोलीस ठाण्यात त्यांची बेपत्ता असल्या बाबतची तक्रार देखील दाखल करण्यात आली होती.

नेमकी घटना काय?

दरम्यान, राजवाडा परिसरातील नाल्यात येथील स्थानिक महिलांना एक मृतदेह दिसून आला, आणि ही बातमी वाऱ्यासारखी पसरल्यानंतर एकच खळबळ उडाली. ग्रामस्थांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली होती. मृतदेहाजवळ आढळलेली चप्पल, शर्ट याच्या आधारावर, मृतदेहाची ओळख कैलास चौधरी यांच्या मुलाने आणि गावातील प्रतिष्ठित नागरिकांनी पटवून दिली. यानंतर हा मृतदेह माजी जिल्हा परिषद सदस्य कैलास चौधरी यांचाच असल्याची निष्पन्न झालं. घटनेची माहिती मिळताच नाशिकरोड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत हा मृतदेह स्थानिकांच्या मदतीने पाण्याबाहेर काढण्यात आला. चौधरी यांच्या मृत्यूमागचं नेमकं कारण काय? हा अपघात आहे की घातपात? याचा तपास नाशिकरोड पोलीस करत आहेत.

नाशिकमध्ये ‘या’ बड्या नेत्याला धक्का

महापालिका निवडणुकांसाठी भाजपने मुलाखतीचा पहिला टप्पा पार करून रणसंग्रामची तयारी सुरू केली असतानाच, पक्षातील गटबाजी उफाळून आली आहे. महिनाभरापूर्वी नाशिक महापालिका निवडणूक प्रमुख पदावर नियुक्त केलेले आमदर राहुल ढिकले यांना हटवत, भाजपने आमदार देवयानी फरांदे यांना नाशिकचे कॅप्टन केले आहे. सेमिफायनलमध्ये भाजपने अचानक कॅप्टन बदलल्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे
नाशिक महापालिकेत भाजपने शंभर प्लसचा नारा दिला आहे. निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर भाजपने महापालिका ताब्यात ठेवण्यासाठी आपली सर्व ताकद पणाला लावली आहे. त्यासाठी नाशिकचे प्रभारी म्हणून संकटमोचक कुंभमेळामंत्री महाजन यांच्याकडे सोपवली. पाठोपाठ महापालिकेच्या निवडणूक प्रमुखपदी आमदार ढिकलेंची नियुक्ती केली होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *