कोल्हापुरात मुलानेच आपल्या आई-वडिलांची हत्या केल्याने खळबळ उडाली आहे. आरोपी मुलाने अत्यंत निर्घृणपणे आपल्या आई-वडिलांना संपवलं. हुपरी शहरात घडलेल्या या घटनेनंतर एकच खळबळ उडाली आहे. हत्या केल्यानंतर मुलाने पोलीस ठाणं गाठत आत्मसमर्पण केलं. घराच्या वाटणीवरुन झालेल्या वादात मुलाने हे कृत्य केल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. सुनील नारायण भोसले असं आरोपी मुलाचं नाव असून, पोलिसांनी त्याला अटक केली आहे. पोलीस पुढील तपास करत असून, हत्येचं दुसरं काही कारण होतं का याचा शोध घेत आहेत. कोल्हापूर जिल्ह्यातील हुपरी शहरात मुलाने आई वडिलांची निर्घृण हत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. शुक्रवारी पहाटे 5 वाजण्याच्या सुमारास इंग्रोळे कॉर्नरजवळ पोटच्या गोळ्यानेच आई आणि वडिलांची राहत्या घरी हत्या केल्याने एकच खळबळ उडाली आहे. घराची वाटणी करून देण्यावरून ही हत्या केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. हत्या केल्यानंतर मुलगा स्वतःहून हुपरी पोलीस हजर झाला आहे. काचा, विळती, दगड आणि काठीने प्रहार करत मुलाने आई-वडिलांचा निर्घृण खून केला आहे. विजयमाला नारायण भोसले (70), नारायण गणपतराव भोसले (78) अशी मृत आई वडिलांची नावे आहेत. आरोपी सुनील नारायण भोसले याला हुपरी पोलिसांनी जेरबंद केलं आहे.

कोल्हापुरात मुलानेच आपल्या आई-वडिलांची हत्या केल्याने खळबळ उडाली आहे. आरोपी मुलाने अत्यंत निर्घृणपणे आपल्या आई-वडिलांना संपवलं. हुपरी शहरात घडलेल्या या घटनेनंतर एकच खळबळ उडाली आहे. हत्या केल्यानंतर मुलाने पोलीस ठाणं गाठत आत्मसमर्पण केलं. घराच्या वाटणीवरुन झालेल्या वादात मुलाने हे कृत्य केल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. सुनील नारायण भोसले असं आरोपी मुलाचं नाव असून, पोलिसांनी त्याला अटक केली आहे. पोलीस पुढील तपास करत असून, हत्येचं दुसरं काही कारण होतं का याचा शोध घेत आहेत.

कोल्हापूर जिल्ह्यातील हुपरी शहरात मुलाने आई वडिलांची निर्घृण हत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. शुक्रवारी पहाटे 5 वाजण्याच्या सुमारास इंग्रोळे कॉर्नरजवळ पोटच्या गोळ्यानेच आई आणि वडिलांची राहत्या घरी हत्या केल्याने एकच खळबळ उडाली आहे. घराची वाटणी करून देण्यावरून ही हत्या केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. हत्या केल्यानंतर मुलगा स्वतःहून हुपरी पोलीस हजर झाला आहे.

काचा, विळती, दगड आणि काठीने प्रहार करत मुलाने आई-वडिलांचा निर्घृण खून केला आहे. विजयमाला नारायण भोसले (70), नारायण गणपतराव भोसले (78) अशी मृत आई वडिलांची नावे आहेत. आरोपी सुनील नारायण भोसले याला हुपरी पोलिसांनी जेरबंद केलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *