शिवसेनेचे माजी जिल्हा परिषद सदस्य बेपत्ता; नाल्यात आढळला मृतदेह

नाशिकमधून एक भयंकर प्रकार समोर आला आहे. शिवसेनेचे पळसे गाटातील माजी जिल्हा परिषद सदस्य कैलास किसन चौधरी यांचा कुजलेला मृतदेह एका नाल्यात सापडल्याने सगळीकडे खळबळ उडाली आहे. शिवनेना पळसे गाटाचे कैलास चौधरी हे काही दिवसांपसून बेपत्ता होते.

काय आहे नेमकं प्रकरण?
गेल्या आठवडाभरापासून बेपत्ता झालेले जिल्हा परिषदेचे माजी सदस्य कैलास किसन चौधरी यांचा मृतदेह पळसे पंपिंग रोडवरील एका नाल्याच्या पुलाखाली गुरुवारी (18 डिसेंबर 2025)ला दुपारी आढळून आला. राहत्या घरातून अचानकपणे बेपत्ता असलेले चौधरी कोणालाही न सांगता घरातून निघाले आणि तेव्हावपासूनच ते बेपत्ता झाले असावेत असा अंदाज लावला जात आहे.

शिवसेना पळसे गटाचे सदस्य बेपत्ता कधी झाले?
गुरुवारी ( 11 डिसेंबर 2025) ला कैलास चैधरी बेपत्ता झाल्यानंतर त्यांच्या कुटुंबीयांकडून सर्वत्र शोध घेतला जात होता, मात्र ते सापडले नाहीत. याप्रकरणी कुटुंबीयांच्या तक्रारीवरून नाशिकरोड पोलिसांनी बेपत्ता झाल्याची नोंद केली होती. दरम्यान, पळसे राजवाडा नाल्यावरील पुलाखाली गुरुवारी दुपारी चौधरी यांचा अत्यंत वाईट अवस्थेत कुजलेल्या मृतदेह पाण्यावर तरंगताना आढळून आला.

घटनास्थळी तपास कार्य सुरु
स्थानिक पोलिसांनी तातडीने घटनास्थळी येऊन तपास प्रक्रिया सुरु केली.  पोलिस सुनील गायधनी यांनी तत्काळ सदर घटनेची माहिती नाशिकरोड पोलिसांना दिली. पोलिसांनी पंचनामा करत मृतदेह आजच ( 18 डिसेंबर 2025) ला शवविच्छेदनासाठी हलवला आहे. घटनास्थळी कोणतेच पुरावे सापडले नाहीत त्यामुळे या घटनेमागचं कारण शवविच्छेदनानंतरच कळेल.

 

निवडणुकीत घवघवीत विजय
शिवसेनेच्या पळसे गटातून 2007 साली त्यांनी शिवसेनेच्या तिकिटावर निवडणूक (Election) लढवली होती. या निवडणुकीत ते भरघोस मतांनी विजयी झाले होते. चौधरी यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, एक मुलगी असा परिवार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *