45 वर्षीय विवाहितेने मुंबईत आयुष्य संपवलं, दीर बघत बसला; विवस्त्र बॉडी सापडली, चॅटिंगमध्ये अनैतिक संबंध उघड

एक ४५ वर्षीय महिला घरामध्ये गळफास घेऊन आत्महत्या करीत असताना, तिचा दीर केवळ पाहत राहिला. त्याने तिला रोखले तर नाहीच, उलट तिची मुलगी घरात येण्याचा प्रयत्न करीत असताना, त्याने दरवाजाही उघडला नाही. ही धक्कादायक घटना मुंबईतील वडाळा परिसरातून समोर आली आहे. या महिलेचा जीव गेल्यानंतर या दिराने दरवाजा उघडला. धक्कादायक म्हणजे महिलेचा मृतदेह विवस्त्र अवस्थेत सापडला. महिलेच्या मुलीने दिलेल्या तक्रारीवरून, वडाळा ट्रक टर्मिनस पोलिसांनी तिच्या काकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.काय आहे प्रकरण?

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रतीक्षानगर परिसरात एक दाम्पत्य आपल्या २५ वर्षीय मुलीसह वास्तव्यास आहे. या मुलीच्या वडिलांचा आत्येभाऊ काही महिन्यांपासून त्यांच्यासोबत राहत होता. तरुणी आणि तिचे वडील हे शनिवारी कामावर गेले. आई आणि वडिलांचा आत्येभाऊ घरातच होता. सायंकाळी ही तरुणी घरी परतली, त्यावेळी दरवाजा आतून बंद होता. तिने दरवाजा अनेकदा ठोठावला, मात्र कुणीच दरवाजा उघडला नाही. शेजाऱ्यांनीही दरवाजा ठोठावला, तरीही दरवाजा उघडला नाही. दरवाजा घट्ट बसला असून बाहेरून ढकला, असे सांगून वडिलांचा आत्येभाऊ वेळ काढू लागला.

बऱ्याच वेळाने त्याने दरवाजा उघडला. आत पाहिले असता तरुणीची आई विवस्त्र अवस्थेत गळफास लावलेल्या स्थितीत आढळली. डोळ्यासमोर आत्महत्या होत असताना, आईला रोखले का नाही अशी विचारणा तिने वडिलांच्या आत्येभावाकडे केली. मात्र त्याच्याकडे उत्तर नव्हते. तरुणीने आईचा मोबाइल तपासला असता, काही चॅट आढळले. यामध्ये तिची आई आणि वडिलांचा आत्येभाऊ यांच्यात विवाहबाह्य संबंध असल्याचे निदर्शनास आले. त्यातूनच हा प्रकार घडल्याने तरुणीने वडाळा टीटी पोलिस ठाण्यात तक्रार केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *