ठाण्यातील महत्त्वाच्या मार्गावर आजपासून चार महिने वाहतूक बंदी; पर्यायी मार्ग कोणते?

मुंबई-नाशिक महामार्गावरील ठाण्यातील एका महत्त्वाच्या मार्गावर आजपासून (15 डिसेंबरपासून) वाहतूक बदल करण्यात आले आहेत. रस्ता रुंदीकरणाच्या कामामुळे हे बदल पुढील चार महिने लागू राहणार आहेत. माजिवाडा ते वडपे दरम्यान रस्ता रुंदीकरणाचे काम सुरू असल्याने या पट्ट्यातील वाहतूक वळवण्यात आली आहे.

महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून (MSRDC) या प्रकल्पाचे काम सुरू आहे. याच पार्श्वभूमीवर खारेगाव भुयारी मार्गावर तांत्रिक कामे हाती घेण्यात येणार असून, त्यामुळे या भागात मोठ्या प्रमाणावर वाहतूक बंदी जाहीर करण्यात आली आहे. ही बंदी आजपासून लागू होऊन थेट 9 एप्रिल 2026 पर्यंत राहणार आहे. परिणामी, पुढील चार महिने प्रवाशांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागणार आहे. ही वाहतूक बंदी 24 तास लागू राहणार असल्याने प्रवाशांना पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *