दोन वर्ष फरार, कोट्यवधींच्या फसवणुकीतील बिल्डर पिता-पुत्राला अखेर अटक
अनेक कोट्यवधी रुपयांच्या फसवणुकीत शोध घेत असलेल्या कस्तुरबा मार्ग पोलिसांना मोठे यश मिळाले आहे. तब्बल दोन वर्षे पोलिसांना चकवा देत फरार असलेल्या त्रिवेणी डेव्हलपर्सचे संचालक मिहीर अशोक जेठवा आणि त्याचे वडील अशोक अरविंद जेठवा या वॉण्टेड पिता–पुत्र जोडीला केरळमधून अटक करण्यात आली. या दोघांवर मुंबईसह विविध पोलीस ठाण्यांत फसवणुकीचे दहा पेक्षा जास्त गंभीर गुन्हे दाखल आहेत.
