ते 7 डिसेंबर 2025 दरम्यान सलग 3 दिवस समुद्राला मोठी भरती येणार आहे. या भरती दरम्यान समुद्रामध्ये साडेचार मीटरपेक्षा अधिक उंचीच्या लाटा उसळणार आहेत. मुंबई महानगरपालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन विभागामार्फत मोठ्या भरतीचा तपशिल जाहीर करण्यात आला आहे. 6 डिसेंबर रोजी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन असतो. यानिमित्ताने दादर चैत्यभूमीवर बाबासाहेबांच्या अनुयायांची मोठी गर्दी होते. दादरला चैत्यभूमीवर जाणाऱ्या अनुयायांना खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
मुंबई महापालिकेने भरतीचा दिनांक व वेळ यासह भरती दरम्यान समुद्रात उसळणा-या लाटांची उंचीदेखील जाहीर केली आहे. दिनांक 6 डिसेंबर 2025 रोजी मध्यरात्री 12 वाजून 39 मिनिटांनी 5.03 उंचीच्या लाटा उसळणार आहेत. मोठी भरती असण्याच्या सर्व दिवशी भरती कालावधीदरम्यान नागरिकांनी समुद्रकिना-या नजीक जावू नये, तसेच या अनुषंगाने बृहन्मुंबई महानगरपालिकेद्वारे मुंबई पोलिसांद्वारे वेळोवेळी देण्यात येणा-या सुचनांचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन महानगरपालिका प्रशासनाद्वारे नागरिकांना करण्यात येत आहे. तसेच भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनी चैत्यभूमी आणि छत्रपती शिवाजी महाराज मैदान (शिवाजी पार्क) येथे येणाऱ्या अनुयायांनीदेखील समुद्रकिनारी योग्य खबरदारी बाळगावी असे आवाहन केले आहे.
वरीलनुसार बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन विभागाद्वारे कळविण्यात आलेला मोठ्या भरतींचा तपशिल खालीलप्रमाणे
1. गुरुवार, दि. 4 – 12 – 2025 – रात्री – 11:52 वा.- लाटांची उंची – 4.96 मीटर
2. शुक्रवार, दि. 5 – 12 – 2025 सकाळी – 11:30 वा.- लाटांची उंची – 4.14 मीटर
3. शनिवार, दि. 6 – 12 – 2025 -मध्यरात्री – 12.39 वा.-लाटांची उंची – 5.03 मीटर
4. शनिवार, दि. 6 – 12 – 2025 -दुपारी – 12.20 वा.- लाटांची उंची – 4.17 मीटर
5. रविवार, दि. 7 – 12 – 2025 -मध्यरात्री –1.27 वा. लाटांची उंची – 5.01 मीटर
6. रविवार, दि. 7- 12 – 2025 -दुपारी – 1.10 वा. लाटांची उंची – 4.15 मीटर
