मध्य रेल्वेनं अचानक बदलला तिकीटाचा नियम; 13 स्थानकांवर…, कारणही सांगितलं!

रेल्वे तिकीट (Railway Tieket) आरक्षणाच्या प्रक्रियेमध्ये मागील काही वर्षांमध्ये बरेच बदल झाले आहेत. प्रवाशांचा प्रवास सुकर करत, तिकीट आरक्षण ते प्रवासादरम्यानच्या कोणत्याही प्रक्रियेत क्लिष्टपणा येऊ नये यासाठी रेल्वे प्रशासन सदैव प्रयत्नशील असतं. त्याचकरता वेळोवेळी काही महत्त्वाचे नियमही आखले जातात. असाच एक नियम मध्य रेल्वेच्या यंत्रणेनं प्रवाशांसाठी लागू केला आहे. ज्यामध्ये एका विशेष श्रेणीतील तिकीटसेवा तूर्तास बंद ठेवली जाणार आहे.

का घेण्यात आला हा निर्णय? 

मध्य रेल्वेच्या अख्तयारित येणाऱ्या रेल्वे स्थानकांवर होणारी तोबा गर्दी पाहता त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी म्हणून तात्पुरत्या स्वरुपात (CSMT)  मुंबईसह 13 रेल्वे स्थानकांवरील प्लॅटफॉर्म तिकीट सुविधा तूर्तास बंद ठेवली जाणार आहे. महापरिनिर्वाण दिनानिमित्त रेल्वे स्थानकांवप होणारी गर्दी पाहता प्रत्यक्षात रेल्वेनं प्रवास करणाऱ्या प्रवाशांना वर्दळीच्या स्थानकांवर व्यवस्थित ट्रेनमध्ये चढ-उतार करता यावा यासाठी हा नियम लागू करण्यात आला आहे.

कधीपासून कधीपर्यंत लागू असेल हा नियम? 

रेल्वे प्रशासनाच्या माहितीनुसार प्लॅटफॉर्न तिकीटांवरील बंदी 5 डिसेंबरपासून लागू होणार असून, ती 7 डिसेंबर 2025 पर्यंत लागू असेल. यामध्ये ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग, लहान मुलं आणि महिला प्रवाशांना मात्र नियमातून वगळण्यात आलं आहे. थोडक्यात ज्या प्रवाशांना इतरांच्या मदतीनं रेल्वेत चढ- उतार करावी लागते अशा प्रवाशांसोबतच्या मंडळींना प्लॅटफॉर्म तिकीट दिली जाईल.

कोणत्या रेल्वे स्थानकांवर प्लॅटफॉर्म तिकीटांची सुविधा बंद असेल? 

  • छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT)
  • दादर
  • भुसावळ
  • नाशिक रोड
  • मनमाड
  • जळगाव
  • अकोला
  • शेगाव
  • पाचोरा
  • बंडेरा
  • मलकापूर
  • चाळीसगाव
  • नागपूर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *