नांदेड जिल्ह्यातील आंतरजातीय प्रेम प्रकरणात सक्षम ताटे याची हत्या झाल्याची घटना घडली होती. 27 नोव्हेंबर रोजी सायंकाळी शहरातील जुनागंज भागात ही घटना घडली. या घटनेआधी एक सीसीटीव्ही फुटेज आता समोर आला आहे. मुलीचा आरोपी भाऊ इतर सहकाऱ्यांसह सक्षम ताटे याच्या घराजवळ जाऊन रेकी करत असल्याचं या व्हिडिओमध्ये दिसत आहे. जवळपास पाच ते सहा तरुण या सीसीटीव्हीमध्ये दिसत आहेत. या सीसीटीव्हीच्या माध्यमातून पोलीस या तरुणांचा शोध घेत आहेत.
सक्षम ताटे खून प्रकरणात सातवा आरोपी अटक
27 नोव्हेंबर रोजी सक्षम गौतम ताटे या तरुणाची हत्या झाली होती. या प्रकरणी एक महिला आणि एक अल्पवयीन बालक अशा सहा लोकांना अटक केली होती. त्यातील चार जण 4 डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडीत आहेत. या प्रकरणात पोलिसांनी मंगळवारी दि. 2 नोव्हेंबर रोजी रात्री सातव्या आरोपीला अटक केली होती. त्याला कोर्टाने तीन दिवसांची पोली कोठडी सुनावली आहे. पोलिसांनी या प्रकरणातील सातवा संशयित आरोपी अमन देविदास शिरसे (वय 22 रा. माळटेकडी, नांदेड) यास अटक केली होती. संशयित आरोपी अमन शिरसेला न्यायालयासमक्ष हजर केले. या प्रकरणात आरोपी अमन शिरसे याला तीन दिवस अर्थात आजपर्यंत पोलीस कोठडीत पाठविले आहे.
