दरवाढीनंतर आज पुन्हा स्वस्त झालं सोनं, ग्राहकांना दिलासा

देशात आज सोन्या-चांदीचे दर काहीसे घसरले आहेत. 18, 22 आणि 24 कॅरेटच्या दरात पुन्हा एकदा घसरण झाली आहे. अलिकडच्या काळात झालेल्या तेजीनंतर आणि पुढील महिन्यात अमेरिकन फेडच्या चलनविषयक धोरणावर लक्ष केंद्रित केल्यानंतर स्पॉट बुकिंगमुळं वायदे बाजार म्हणजे एमसीएक्समध्ये सोन्या-चांदीच्या दरात घसरण झाली आहे.

देशांतर्गत सराफा बाजारातही सोन्याच्या किमती कमी झाल्या आहेत. परंतु त्याउलट, चांदीमध्ये जोरदार तेजी दिसून आली आहे. गुरुवारी (27 नोव्हेंबर) सुरुवातीच्या व्यवहारात, एमसीएक्स गोल्ड 5 डिसेंबरचा वायदा सुमारे 600 रुपयांनी घसरून 1,25,351 रुपये प्रति 10 ग्रॅम या इंट्राडे नीचांकी पातळीवर पोहोचला आहे. तर, एमसीएक्सवर चांदीचा 5 डिसेंबरचा वायदादेखील सुमारे 1000 रुपयांनी घसरून 1,60,262 रुपये प्रति किलो या इंट्राडे नीचांकी पातळीवर पोहोचला.

आज 24 कॅरेट सोन्याच्या दरात 160 रुपयांची घट झाली असून 1,27,750 रुपयांवर पोहोचले आहे. तर 22 कॅरेट सोन्याच्या दरात 150 रुपयांची घट झाली असून 1,17,100 रुपयांवर स्थिरावले आहे. 18 कॅरेट सोन्याच्या दरात 120 रुपयांची घट झाली असून 95,810 रुपयांवर सोनं स्थिरावलं आहे.

आजचा सोन्याचा भाव काय?

– 10 ग्रॅम सोनं किंमत

10 ग्रॅम 22 कॅरेट 1,17,100 रुपये
10 ग्रॅम 24 कॅरेट 1,27,750 रुपये
10 ग्रॅम 18 कॅरेट 95,810 रुपये

– 1 ग्रॅम सोनं किंमत
1 ग्रॅम 22 कॅरेट 11,710 रुपये
1 ग्रॅम 24 कॅरेट 12,775 रुपये
1 ग्रॅम 18 कॅरेट 9,581 रुपये

– 8 ग्रॅम सोनं किंमत
8 ग्रॅम 22 कॅरेट 93,680 रुपये
8 ग्रॅम 24 कॅरेट 1,02,200 रुपये
8 ग्रॅम 18 कॅरेट 76,648 रुपये

– मुंबई – पुण्यात कसे असतील सोन्याचे दर? (Today Gold Rate in Mumbai Pune)

10 ग्रॅम 22 कॅरेट 1,17,100 रुपये
10 ग्रॅम 24 कॅरेट 1,27,750 रुपये
10 ग्रॅम 18 कॅरेट 95,810 रुपये

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *