साडेपाच वर्षांच्या चिमुकलीवर तिच्या नात्यातीलच एका व्यक्तीने लैंगिक अत्याचार

बीड जिल्ह्याच्या शिरूर कासार पोलीस ठाणे हद्दीतून एक अतिशय संतापजनक आणि माणुसकीला काळिमा फासणारी घटना समोर आली आहे. येथील एका साडेपाच वर्षांच्या चिमुकलीवर तिच्या नात्यातीलच एका व्यक्तीने लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
या घटनेपेक्षाही अधिक धक्कादायक बाब म्हणजे, या नराधमावर गुन्हा दाखल होऊ नये यासाठी गावातील लोकांनी पीडित मुलीच्या आईवर प्रचंड दबाव आणल्याचा आरोप आहे. बदनामीच्या भीतीने ग्रामस्थांनी चक्क बैठका घेऊन गुन्हा दडपण्याचा प्रयत्न केला, ज्यामुळे पीडित मुलीला तब्बल चार दिवस उपचारासाठी रुग्णालयात जाऊ दिले नाही, असा संतापजनक प्रकार प्राथमिक तपासात उघड झाला आहे.

उपचारासाठी चार दिवस दिरंगाई

11 नोव्हेंबर रोजी ही अत्याचाराची अमानुष घटना घडली. या घटनेनंतर मुलीला असह्य वेदना होत असतानाही ग्रामस्थांनी ‘गावाची बदनामी नको’ या कारणास्तव पीडित कुटुंबाला उपचारासाठी बीड येथे जाण्यास मज्जाव केला. चार दिवस त्रास सहन केल्यानंतर अखेर मुलीच्या नात्यातील काही व्यक्तींना ही घटना समजली. त्यांनी थेट पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत यांच्याशी संपर्क साधला. त्यानंतर प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेत शिरूर कासार पोलिसांनी तात्काळ गुन्हा नोंदवून घेतला. सध्या पीडित चिमुरडीवर बीड येथील शासकीय रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. आपल्या मुलीवर झालेल्या अत्याचाराची आणि त्यानंतर गावकऱ्यांनी केलेल्या छळाची आपबीती सांगत असताना पीडित मुलीच्या आईला अश्रू अनावर झाले होते.

पोलिसांच्या भूमिकेवरही प्रश्नचिन्ह

या संपूर्ण प्रकरणातील ग्रामस्थांच्या भूमिकेवर तीव्र संताप व्यक्त होत आहे. गावातील लोकांनी बदनामीच्या भीतीने पीडित कुटुंबालाच धमकी दिल्याचं समोर आलं आहे. या घटनेतील पोलिसांच्या भूमिकेवरही प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.

कोस्टल रोडवर असताना वारंवार गौरीला फोन

भाजप नेत्या पंकजा मुंडे यांचे स्वीय सहायक असलेले अनंत गर्जे यांच्या पत्नीने शनिवारी आपल्या आयुष्याची अखेर केली. डॉ. गौरी पालवे यांनी वरळीतील राहत्या घरात गळफास घेत आपले जीवन संपवले. अनंत गर्जे यांचे विवाहबाह्य संबंध असल्याचं कळाल्यानंतर त्यांच्यात वाद वाढत गेले आणि त्याच तणावातून गौरी यांनी हे टोकाचं पाऊल उचलल्याचं सांगितलं जात आहे, तसा दावा त्यांच्या नातेवाईकांनी केला आहे. इतकंच नाही तर, गौरीला अनंत आणि सासरचे त्रास देत असल्याचंही त्यांनी सांगितलं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *