ठाण्यातील तीन हात नाका, नितीन जंक्शन, कॅडबरी जंक्शन आणि माजीवाड्यातील गोल्डन डायज जंक्शन येथे मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होते. या पार्श्वभूमीवर एमएमआरडीएने (MMRDA) आनंदनगर ते साकेतदरम्यान ईस्टर्न एक्सप्रेस हायवेवरून 8.24 किमी लांबीचा उन्नत मार्ग उभारण्याचे काम हाती घेत आहे, ज्यामुळे ठाण्यातील वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होईल.
सध्या ठाण्यातील ईस्टर्न एक्सप्रेस हायवेवरील तीन हात नाका, नितीन जंक्शन, कॅडबरी जंक्शन आणि माजीवाड्यातील गोल्डन डायज जंक्शन येथे कायमस्वरूपी वाहतूक कोंडी होत असते. प्रतीक्षाकाळ वाढण्याचे एक प्रमुख कारण म्हणजे तीन हात नाका, कॅडबरी जंक्शन आणि माजीवाडा येथे सहा-लेनचे उड्डाणपूल असले तरी, तिथे ये-जा करणारी वाहतूक आणि विविध सर्व्हिस रोड्स व स्लिप रोड मुख्य रस्त्यात मिसळतात.
