जमीन गैरव्यवहार प्रकरणी शीतल तेजवानीचा जबाब पुणे पोलिसांनी नोंदवला आहे. पुणे पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने जबाब नोंदवला आहे. पोलिसांनी शीतल तेजवानीला संबंधित कागदपत्रांसह उपस्थित राहण्याचे आदेश दिले आहेत. कुलमुखत्याररत्राशी संबंधित कागदपत्रे घेऊन उपस्थित राहण्यास शीतल तेजवानीला सांगण्यात आलं आहे. मात्र शीतल तेजवानीला अटक का केली नाही असा सवाल सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी विचारला आहे.
जमीन गैरव्यवहार प्रकरणी पुणे पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेनं शीतल तेजवानीचा जबाब नोंदवला आहे. मंगळवारी संध्याकाळी 4 नंतर शीतल तेजवानी पोलीस आयुक्तालयात आली होती. तिथे तेजवानीचा प्राथमिक जबाब नोंदवण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. गुरुवारी तिला पुन्हा संबंधित कागदपत्रांसह हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहे. मात्र शीतल तेजवानीला अटक का केली नाही असा सवाल सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी विचारला आहे.
शीतल तेजवाणीला अटक का झाली नाही?”.
अंजली दमानिया यांनी म्हटलं आहे की, “कागदपत्रांसह हजर राहावं असं म्हणण्यापेक्षा त्यांना तिथल्या तिथं अटक का केलं नाही? कारण त्याच्यातील जे मुद्दे आहेत त्याच्यावर 7 ते 14 वर्षांची शिक्षा आहे. सुप्रीम कोर्टाचा कायदा दोन वर्षांच्या वर शिक्षा होत असेल तरच अटक करावी असं सांगतं. ही तर 7 ते 14 वर्षांची शिक्षा आहे, मग शीतल तेजवाणीला अटक का झाली नाही?”.
अमेडिया कंपनीने महसूल बुडवल्याचा ठपका?
अमेडिया कंपनीने कोरेगाव पार्क येथील महार वतनाची जमीन खरेदी केल्याच्या व्यवहारात मुद्रांत शुल्कात माफी मिळवताना जिल्हा उद्योग केंद्राचे पात्रता प्रमाणपत्र जोडले नसल्याचं दिसून आलं. त्यामुळे दस्त नोंदणीवेळी दिलेली मुद्रांक शुल्कमाफी ग्राह्य ठरत नाही, असा निष्कर्ष चौकशी समितीने मांडला आहे. मुद्रांक शुल्कमाफी घेऊन सरकारचा महसूल बुडवल्याचा ठपकाही चौकशी समितीने अहवालात ठेवला आहे.
कोण आहे शीतल मेजवानी?
पुण्याच्या कोरेगाव पार्क परिसरातल्या 40 एकर जमिनीच्या गैरव्यवहारप्रकरणात शीतल तेजवानी हिनं मोठी भूमिका बजावली. शीतल तेजवानीनं जमीन ताब्यात घेण्यासाठी पॉवर ऑफ अटर्नीचं हत्यार वापरलं. तिनं जमीन थेट नावावर करण्यासाठी वेगवेगळे फंडेही वापरले. पार्थ अजित पवार यांची या प्रकरणात जेवढी महत्वाची भूमिका आहे तेवढीच महत्वाची भूमिका शीतल तेजवानीनं बजावली.
शीतल तेजवानी हिनं कोरेगाव पार्क जमीन व्यवहारात अतिशय महत्वाची भूमिका बजावली. याच शीतल तेजवानी हिनं कोरेगाव पार्क परिसरातील महार वतनाच्या जमिनीच्या मालकांशी संपर्क साधला. सर्व्हे क्र. 88 हिस्सा नंबर 1 ते 26 – ही जमीन बॉटनिकल सर्व्हे ऑफ इंडियाच्या ताब्यात होती. ती जमीन सरकारच्या ताब्यातून सोडवणं आणि त्याच्या विक्रीसाठी कधीही रद्द न होणारी पॉवर ऑफ अटर्नी करवून घेतली. शीतलनं जवळपास दोन ते तीन वर्ष परिसरातल्या 272 जणांचा शोध घेऊन त्या जमिनीच्या पॉवर ऑफ अटर्नी करवून घेतल्या. या पॉवर ऑफ अटर्नीच्या मोबदल्यात कुणाला 2 हजार कुणाला 5 हजार तर कुणाला 25 हजार देऊन त्यांना वाटेस लावलं.
शीतल तेजवानीनं जमीन हडपण्याचं काम एकदम थंड डोक्यानं सुरु ठेवलं होतं. अजगर जसा आपल्या भक्षाला गिळतो आणि शांत बसतो तशी शीतल तेजवानी जमीन हडपून शांत बसली होती. ती एका संधीची वाट पाहत होती. 2025मध्ये शीतलनं अमेडिया कंपनीच्या रुपानं पार्थ अजित पवार हा ग्राहक शोधला होता. कागदपत्रांवर विश्वास ठेवला तर 300 कोटी रुपये शीतलनं घेतल्याचं दिसतंय. प्रत्यक्षात ही रक्कम कितीतरी अधिक असण्याची शक्यता आहे.
