ऑपरेशन सिंदूरनंतर ‘ते’ सर्व विद्यार्थी तपास यंत्रणांच्या रडारवर

जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर, भारताने ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर दिलं होतं. भारताने पाकिस्तानमधील दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त केलेत. त्यानंतर पाकिस्तानही शांत बसणार नाहीत. हे लक्षात घेत ऑपरेशन सिंदूरनंतर जम्मू-काश्मीर सोडून देशभरातील विविध विद्यापीठांमध्ये प्रवेश घेतलेले लोक तपास यंत्रणांच्या रडारवर आहेत.

ऑपरेशन सिंदूरचा बदला घेण्यासाठी, पाकिस्तानी कट्टरपंथी संघटनांनी जम्मू-काश्मीरमधील त्यांच्या कार्यकर्त्यांना भारतातील विविध विद्यापीठांमध्ये शिक्षण घेण्यासाठी पाठवले आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. ऑपरेशन सिंदूरमध्ये मारल्या गेलेल्या जैश-ए-मोहम्मदचा म्होरक्या मसूद अझहरच्या कुटुंबाचा बदला घेण्यासाठी जैश-ए-मोहम्मद भारतात आपले पाय पसरवत आहेत. ते विविध सोशल मीडिया साइट्सद्वारे जैशशी जोडले होते.

आता, गेल्या काही महिन्यांत देशभरातील विविध विद्यापीठांमध्ये प्रवेश घेतलेले जम्मू-काश्मीरमधील सर्व तरुण तपास यंत्रणांच्या रडारवर आहेत. तपास यंत्रणांना अशी माहिती मिळाली आहे की हे कट्टरपंथी उत्तर प्रदेशात आय लव्ह मुहम्मद चळवळ नियोजित प्रमाणे पसरवू शकले नाहीत. जम्मू-काश्मीरमध्ये ऑपरेशन क्लीनची तयारी सुरु करण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *