मीरारोडमध्ये आजोबांचा दुसऱ्या आजोबांना ठोसा, संगीतखुर्चीत पत्नीला हरवल्याचा राग

मीरारोडमध्ये आजोबांचा दुसऱ्या आजोबांना ठोसा, संगीतखुर्चीत पत्नीला हरवल्याचा राग

प्रेयसीची छेड काढली म्हणून प्रियकराने गुंडांना बदडल्याचं चित्र नेहमीचं आहे. पण मीरारोडमध्ये एका आजोबांने बायकोसाठी चक्क दुसऱ्या आजोबांचं नाकं फोडल्याचं समोर आलं आहे. संगीतखुर्ची स्पर्धेत पत्नी हरल्याचा राग त्यांनी ठोसा मारुन व्यक्त केला आहे.

मीरा रोडच्या एन.एल. दालमिया शाळेत ग्रँड पॅरेन्ट डे होता. त्यावेळी विद्यार्थ्यांच्या आजी-आजोबांसाठी संगीत खुर्चीचं आयोजन केलं होतं. यात संतोष शुक्ला यांची पत्नी आणि राजेंद्र तिवारी हे फायनलमध्ये पोहचले. अखेरच्या क्षणी खुर्ची पकडण्यात यश आलं राजेंद्र तिवारी यांना. तिवारींचा विजय संतोष शुक्ला यांना पचवता आला नाही. तिवारी चीटिंग करुन जिंकले असा आरोप शुक्ला आजोबांनी केला.

दोघांमध्ये झालेल्या वादावादीनंतर शुक्ला आजोबांनी तिवारींच्या नाकावर जोरदार ठोसाही लगावला. 61 वर्षीय शुक्लांचा पारा इतका चढला होता की अखेर पोलिसांना बोलवावं लागलं. दरम्यान पोलिसांनी शुक्ला यांना समज देऊन हे प्रकरण मिटवलं आहे. तर राजेंद्र तिवरी यांनाही स्थानिक रुग्णालयात मलमपट्टी करुन सोडण्यात आलं. मात्र या आजोबांच्या अनोख्या भांडणाची चर्चा सगळीकडे रंगली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *